Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

धुळे जिल्ला पोलीस अधिक्षक चिन्मय पांडित सो यांचा आदेश, आज पासून मोटार सायकल चा वापर बंद....


धुळे -प्रतिनिधी कोरोना च्या आजरामुळे राज्यात मागील आठवड्या पासून लॉक डाऊन असून संपूर्ण संचार बंदी लागू आहे फक्त जीवणाआवश्यक वस्तूसाठी बाहेर जाण्यास मर्यादित वेळेतच परवानगी आहे.बहुतांशी लोक हे शासनाचे आदेश पाळत आहेत. 
मात्र काही लोक व तरुण विनाकारण बाहेर फिरण्याचा प्रकार मात्र अद्याप सुरू आहे. त्यांना पोलीस मज्जाव करत आहेत पण तरी देखिल लोक काही याचे पालन करत नाही असे दिसून येत आहे.
त्यामुळे आज पासून नियम अधिक कठोर करत पो.अधीक्षक सो यांनी आदेश पारित केले आहेत की आज दि.31 मार्च पासून बंदी लागू असे पर्यंत नागरीकांनी भाजी पाला व इतर वस्तू या आपल्या आपल्या प्रभागात अथवा नजीकच्या दुकानातुन च खरेदी करावे या साठी मोटारसायकल घेऊन सर्वानीच बाजारात जाऊ नये.गरज असेल तर पायी जाऊन वस्तू खरेदी करण्यात यावेत.

त्यामुळे मोटारसायकल वापरावर पूर्ण पणे बंदी करण्यात येत असून अनावश्यक मोटारसायकल वापर  रोडवर दिसून आल्या तर मोटार सायकल जप्त करण्याचे आदेश पोलीस विभागास देण्यात आले आहेत.  
त्या मुळे समाज स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी नागरिकानी आदेशांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध