Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

यंदा श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम नाही; कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी कार्यक्रम रद्द



शिरपूर (प्रतिनिधी)दरवर्षी श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम नवमीचे दिवशी श्रीरामजन्मोत्सव साजरा करीत असतो परंतु यावर्षी आपल्या देशावर कोरोनाचे मोठं महासंकट आलेले असल्याने नागरिकांचे रक्षणार्थ संपुर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलेले आहे. 

त्या पार्श्वभूमीवर चैत्र शुक्लपक्षे ९ वार गुरुवार दि.०२-०४-२०२० या दिवशी श्रीराम मंदिर देवस्थान (श्री भोंगे) यशवंत शाळे समोर येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त महाआरती करिता, दर्शनाकरिता व प्रसादा करीता हजर राहू नये असा आदेश प्रशासनाने तर्फे प्राप्त झालेला असून भक्तांनी आपआपल्या घरी श्रीरामरक्षाचे १३ पाठ करून उत्सव साजरा करावा व कोरोनाचे महासंकट समूळ नष्ट करण्याकरिता श्रीराम रायाला प्रार्थना करावी आपण सर्वांनी केलेल्या प्रार्थनेने आपल्या देशावरील नव्हे जगावरील आलेले संकट नक्कीच नष्ट होईल. तरी सर्व श्रीराम भक्तांना प्रशासनाला सहकार्य करावयाचे आहे.

भाविकांना नम्र विनंती की श्रीराम मंदिर देवस्थान येथे कोणीही महाआरती करिता, दर्शनाकरिता व प्रसादाकरिता हजर राहू नये अशी विनंती. महंत सतिषदास महाराज भोंगे मठाधिपती श्रीराम मंदिर देवस्थान व भागवताचार्य प्रमोद महाराज भोंगे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध