Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
:---ब्रेकिंग न्यूज--: दहावीचा विद्यार्थी कोरोनाग्रस्त; आला ३६ जणांच्या संपर्कात...
:---ब्रेकिंग न्यूज--: दहावीचा विद्यार्थी कोरोनाग्रस्त; आला ३६ जणांच्या संपर्कात...
मुंबई :प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा- महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, दक्षिण मुंबईतील एका केंद्रावर दहावीची परीक्षा देणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याच्या संपर्कात आलेले ३६ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा शोध आरोग्य विभाग व पोलिस घेत आहेत. ही बातमी वाचली का? होम कॉरंटाईनचा शिक्का असूनही 'तो' तीन तास रस्त्यावर भटकत होता!. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठांच्या मार्चमधील परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु शिक्षण विभागाने दहावी व बारावीच्या परीक्षा वेळा पत्रका नुसार होतील, असे जाहीर केले. बारावीची परीक्षा पूर्ण झाली; मात्र दहावीची परीक्षा सुरू होती.
दहावीचा सोमवारी (ता. २३) होणारा अखेरचा पेपर मात्र पुढे ढकलण्यात आला. दक्षिण मुंबईतील एका नामांकित शाळेतील दहावीची परीक्षा देणारा एक विद्यार्थी कोरोना चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निदान झाले आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामाठीपुरा येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याने शाळेपासून काही अंतरावरील केंद्रात दहावीची परीक्षा दिली. या केंद्रात ३५३ विद्यार्थी परीक्षा देत होते. एक वर्गात सुमारे २५ विद्यार्थ्यांची व्यवस्था होती. ही बातमी वाचली का? जमावबंदीच्या आदेशाला हरताळ कस्तुरबा रुग्णालयात या विद्यार्थ्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आढळले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याच्यासोबत दहावीची परीक्षा दिलेल्या अन्य विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे मागितली. शिक्षण विभागाने त्या परीक्षा केंद्रातील अन्य विद्यार्थ्यांची माहिती दिली. त्यावरून आरोग्य विभागाने या विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला आहे.
परीक्षा केंद्र संचालकांनी आरोग्य विभाग आणि पोलिसांना तेथील अन्य विद्यार्थ्यांची माहिती दिली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे मा.एकनाथ राव खडसे यांच्या मालकीच्या खडसे फार्म्स,जळगांव येथून आलेल्या उच्च प्रतीच्या 10...
-
चोपडा प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील तीन कुख्यात आणि सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी काल रात्री दरोड्याची पूर्वतयारी करत ...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
बेटिवद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात मागील दोन दिवसांपासून हलकासा रिमझिम पाऊस पडत होता.मात्र,आज शुक्रवार दि.२७ जून रोजी दुपा...
-
चोपडा:- जय रावण प्रतिष्ठान संघटनेच्या 6 व्या वर्धापदिनानिमित्त संघटनेचे अध्यक्ष अमोल संजय पारधी यांच्या संकलपनेतून गरजू शालेय विद्यार्थ्यांन...
-
माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत झाली बैठक कल्याण प्रतिनिधी :- दि.25 जून अंबरनाथच्या मिरॅकल कंपनीतील त्या 259 अन्य...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
शिरपूर प्रतिनिधी - 26 जुन शिरपूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिरपूर शहर पोलीस स्टेशन...
-
अमळनेर : तालुक्यातील जळोद येथील दिलीप उत्तम ठाकरे (चौधरी) वय ५४ याने तुळशीराम हिलाल पाटील यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास ...
-
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचे आदेश अमळनेर : शहरातील अट्टल गुन्हेगाराला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी तीन ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा