Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२०

अमळनेर येथिल आर के नगर चे रहिवासी शिंदे दांपत्यानी "आरोग्य संरक्षक गुढी" उभारून कोरोना विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य सेवक,पोलिस प्रशासन व स्व: स्वच्छतेच्या माध्यमातून कोरोना वर विजय मिळविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.


अमळनेर येथिल आर के नगर चे रहिवासी शिंदे दांपत्यानी "आरोग्य संरक्षक गुढी" उभारून कोरोना विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य सेवक,पोलिस प्रशासन व स्व: स्वच्छतेच्या माध्यमातून कोरोना वर विजय मिळविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी उत्साहात गुढीपाडवा  साजरा केला जातो.दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने याच दिवशी शकांचा पराभव केला. अशी कथित आख्यायिका प्रचलित आहे.यावेळी प्रत्येकाच्या दारी विजयाचे प्रतिक म्हणून गुढी किंवा पताका उभारली जाते. 
            
सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे व शिक्षण विस्तार अधिकारी सौ शैलजा शिंदे यांनी कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आगळी वेगळी गुढी उभारली.कोरोना विषाणूच्या विरोधात विजय मिळविण्यासाठी लढणाऱ्या आरोग्य, पोलिस, शासन प्रशासन यांना यश मिळण्याची प्रतिक असलेली "आरोग्य संरक्षक गुढी" उभारली.
 
        
कोरोना विरोधात देशभर लॉक डाऊन मध्ये शिस्त पाळायला लावणाऱ्या पोलिस काठीवर  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य परिचारिका यांचा प्रतिकात्मक पांढरा वेश ठेवून त्यावर कोरोना साथीच्या विरोधात शासनाच्या आदेशांचे कोट्यवधी जनतेला पालन  करायला लावण्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या पोलिसांचे प्रतिक म्हणून पोलिस टोपी ठेवण्यात आली. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरांचे प्रतिक म्हणून स्टेट्सकोप टांगण्यात आला.तर स्व: स्वच्छतेचे  व स्व: काळजीचे प्रतिक म्हणून मास्क या आरोग्याच्या गुढी वर बांधण्यात आले सदरची गुढी दारी उभारण्यात आली. गुढी ला अंगणातील झाडांच्या फुलांची माळ घरीच करून चढवण्यात आली. रणजित शिंदे व सौ शैलजा शिंदे यांनी कन्या शैलजित सह आरोग्याच्या संरक्षक गुढीचे पूजन केले.सोबतच  कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवण्याचा निर्धार करून  गर्दीपासून दूर राहण्याचा संकल्प गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध