Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ मार्च, २०२०

महिलांनी कोणत्याही संकटाचा बाऊ न करता संघर्ष करण्याची तयारी ठेवून काम करावे. यश निश्‍चित मिळेल हेच माझे महिला दिनानिमित्ताने आवाहन असल्याचा संदेश रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिला


जळगाव:प्रतिनिधी:महिला कितीही मोठ्या पदावर असली तरी तिला यशासाठी संघर्ष करावाच लागतो. घरच्यांची साथ असली तरी महिलांनी स्वत: संघर्ष तयारी करण्याचे धाडस केले पाहिजे.आपल्यालाही जीवनात अनेक अडचणी आल्या यात कुटुंबाची महत्वाची साथ मिळाली, तर जनतेचाही विश्‍वास होता. आपण स्वत:ही संघर्षाची तयारी ठेवली त्यामुळे आज आपण जनतेच्या कामे करून त्यांच्या विश्‍वासास पात्र ठरत आहोत. असे मत भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. महिला दिनाच्या निमित्ताने त्या 'सरकारनामा'शी बोलत होत्या.

रावेर लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षातर्फे त्या दुसऱ्यांदा खासदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत. भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत. पती निखील खडसे यांचे अकाली निधन, सासरे एकनाथराव खडसे यांना करावा लागणारा राजकीय संघर्ष, व कौंटुबिक जबाबदारी अशा संघर्षातूनही त्या सार्वजनिक जीवनात एक सक्षम खासदार म्हणून कार्य करीत आहेत. 

रावेर लोकसभा मतदार संघाचे प्रश्‍न ते सक्षमपणे मांडून त्या सोडवूनही घेत आहेत.त्यामुळे खासदार म्हणून विकासाच्या बाबतीत त्यानीं मतदार संघातील जनतेचा विश्‍वासही संपादन केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे जळगाव दौऱ्यावर आलेल्या असतांना माझ्या आवडत्या खासदारांपैकी रक्षा खडसे एक आहेत. असे स्पष्ट मत त्यानीं व्यक्त केले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध