Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
नारायण राणे तर भाजपचे बकरे : गुलाबराव पाटील
जळगाव प्रतिनिधी:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱयावर आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेतेही व काँग्रेसचे नेते सुनिल केदार देखील आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत आहे. हे समोर आले आहे. याला अनुसरूनच जळगावचे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली.
गुलाबराव पाटीम म्हणाले, उद्धव ठाकरे यापूर्वी अयोध्येत आले होते. त्यावेळी पहिले मंदिर नंतर सरकार असे ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी येईन असे ते म्हणाले होते. त्यानुसार आज ते अयोध्येत आले आहेत.
दरम्यान, हे सरकार शंभर तास चालणार नाही असे भाजपाचे नेते म्हणाले होते. पण आज शंभर दिवस पूर्ण झाले आहेत, त्या प्रश्नावर गुलाबराव पाटील म्हणले की, मागे नारायण राणे म्हणाले होते, गणपती बुडण्याआधी शिवसेना बुडवीन, सरकार अकरा दिवस पण टिकणार नाही. परंतू नारायण राणे आम्हाला काय शिकवणार? ते भाजपचे बकरे बनले आहेत अशी टीका त्यांनी केली. शंभर दिवसच नाही हे सरकार पाच वर्ष टिकेल असा दावा गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयातून हिंदुत्व सोडले नाही हा संकेत देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर गुलाबराव पाटील म्हणाले की, हिंदुत्वाचा ठेका कोणी घेतलाय? बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा