Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शालेय पोषण आहाराचे बिल आणि अपहार करणार्यांवर गुन्हा दाखलसाठी बचत गटाच्या महिलांचे आमरण उपोषण जागतिक महिलादिनी उपोषण सुरू केल्याने संबंधित प्रशासनाची झाली नाचक्की
शालेय पोषण आहाराचे बिल आणि अपहार करणार्यांवर गुन्हा दाखलसाठी बचत गटाच्या महिलांचे आमरण उपोषण जागतिक महिलादिनी उपोषण सुरू केल्याने संबंधित प्रशासनाची झाली नाचक्की
अमळनेर (प्रतिनिधी) बचत गटाने पुरवलेल्या शालेय पोषण आहाराचे बिल मिळत नाही आणि अपहार करणार्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पंचायत समिती आवाराबाहेर महिलादिनापासूनच आमरण उपोषणाला दहिवद येथील सुनीता मांगुलाल साळुंखे बसल्या आहेत. यामुळे प्रशासनाची नाचक्की झाली आहे.
दहिवद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जून ते डिसेम्बरपर्यंत रघुवीर समर्थ बचत गटास पोषण आहाराचा ठेका देण्यात आला होता आणि या बचत गटात सुनीता साळुंखेसह अनुसूचित जाती जमातीच्या विधवा महिला असून त्यांच्या उपजीविकेसाठी गटाला ठेका देण्याची मागणी केली होती. डिसेम्बरपर्यंत सुनीता साळुंखे यांनी पोषण आहाराचे काम केले. मात्र त्यांना बिल मिळाले नाही.
त्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला तरी त्यांना उत्तर मिळाले नाही. म्हणून महिला दिनापासूनच साळुंखे यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्यासोबत आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे , तालुकाध्यक्ष नंदाबाई मावळे , अविनाश पवार , सुनील पारधी ,संदीप सूर्यवंशी यांनी देखील उपोषण सुरू केले. सायंकाळी शालेय पोषण आहार अधीक्षक बी. पी. चौधरी , विस्तार अधिकारी पी. डी. धनगर , यांनी उपोषण स्थळी भेट दिली व पोषण आहाराबाबत चौकशी केली असून अहवाल सादर केला जाईल म्हणून उपोषणापासून परावृत्त होण्याची विनंती केली. मात्र अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्णय उपोषणकर्त्या महिलेने घेतला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा