Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्वांनी स्वतःसह परिवारासाठी व सर्वांसाठी घरीच थांबण्याचे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे कळकळीचे आवाहन
कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्वांनी स्वतःसह परिवारासाठी व सर्वांसाठी घरीच थांबण्याचे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे कळकळीचे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी:कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्वांनी स्वतःसह परिवाराची काळजी घेत सर्वांच्या भल्यासाठी आरोग्यासाठी घरीच थांबावे असे कळकळीचे आवाहन माजी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले आहे.
फार प्रमाणात बऱ्याच ठिकाणी लोक घराबाहेर फिरतांना दिसून येत आहेत. अत्यावश्यक गरजेशिवाय कोणीही बाहेर फिरु नये.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे. त्या आवाहनाला सर्वांनी चांगला सकारात्मक प्रतिसाद द्यायचा आहे.
जगभरात व आपल्या देशात कोरोना व्हायरस ने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वांनी घरातच राहणे आवश्यक आहे. स्वतःसाठी व आपल्या परिवाराच्या भल्यासाठी आपण सक्तीने घरातच रहावे.
अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. हे अजिबात चांगले नाही. आपल्यामुळे कोणाला व इतरांमुळे आपल्याला अजिबात त्रास होता कामा नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी. नगर परिषद प्रशासनाला, शासकीय यंत्रणेला व पोलीस यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करावे.
कोरोना व्हायरस ने सर्वत्र प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. फार मोठे संकट संपूर्ण जगावर व आपल्या देशावर आलेले आहे. संपूर्ण जगाला या महाभयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सर्वांनी खूपच गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपल्या स्वतःची व इतरांची काळजी घ्यायची आहे. माणुसकी न विसरता व कोणताही धोका न पत्करता आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचे आहे.
पोलिस प्रशासनाला नाईलाजाने बाहेर निघणाऱ्यांना काही प्रमाणात चोप द्यावा लागत आहे. कोणी पायी तर कोणी आपल्या वाहनाने फिरतांना दिसून येत आहेत, हे अजिबात योग्य नाही.
आता सर्वत्र संचारबंदी देखील लागू झाली आहे. पोलीस देखील त्यांच्या पद्धतीने गर्दी करणाऱ्यांवर व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करू शकतील. सर्वांना विनंती आहे की, विनाकारण कुठेही फिरू नका. घरातच रहा. आपल्या घरातील प्रत्येकाला देखील बाहेर जाऊ देऊ नका.
सर्वांनी स्वतःची व आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. प्रशासनाला सहकार्य करा. नगर परिषदेला सहकार्य करावे. कुठेही काहीही शंकास्पद आढळून आल्यास नगर परिषद, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांना कळवावे असे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा