Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ मार्च, २०२०

सर्व वीज ग्राहक ला कक्ष अभियंता ची कळकळीची हात जोडून विनंती...


सर्व वीज ग्राहक ना कळविण्यात येते की पूर्ण देशावर करोना आजाराचे भीषण असे संकट ओढवले असून त्याची आपणा सर्वांना कल्पना आहे,
सद्या च्या परिस्थिती मध्ये महावितरण कंपनी ही अत्यावश्यक सेवा देण्यास तत्पर असून त्याप्रमाणे आपत्कालीन सेवा देण्यास सज्ज झाली आहे,
मात्र ही सेवा देताना कुठलाही कक्ष कार्यालयाचा अधिकारी व कर्मचारी हा घरी बसून वीज पुरवठा सेवा देऊ शकत नाही,त्यामुळे तो जीवाची पर्वा न करता ,स्वतःला आजार होऊ शकतो ,जीव जाऊ शकतो हे माहीत असताना देखील निव्वळ आणि निव्वळ ग्राहक सेवा व जास्तीत जास्त अखंडित वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न करत आहे,मात्र 
असे लक्षात येत आहे की काही ग्राहक(ज्यांनि जीव वाचवण्यासाठी घरी थांबायचे आहेत) हे अश्या परिस्थितीचा फायदा घेत कक्ष अभियंता व वायरमन यांना विनाकारण वीज पुरवठा का खंडित झाला,किती वेळ लागेल,आम्ही बिले भरतो फुकट नाही वापरत,तुम्हला काम जमत नाही का,10 मिनिट मध्ये आली पाहिजे वगैरे अश्या प्रकारच्या विनंतीवजा (धमक्या) देत आहेत,त्यांना सध्या अवस्थेत असणाऱ्या देशावरील संकटाशी काही देने घेणे नाही किव्हा त्याच्या तीव्रतेचा अंदाज नाही,फक्त आम्ही बिले भरतो आम्हाला वीज हवी अश्या अविर्भावात नाहक कक्ष अभियंता व वायरमन यांना त्रास देत आहेत,
मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे ,जो कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला आता आणि पुढेही सेवा देणार आहे,ज्यावर सर्व हॉस्पिटल,सर्व अत्यावश्यक सेवा अवलंबून आहेत अश्या वीज सेवेत किंवा कोणत्याही सेवा देणार्याला "सौजन्याने वागावे व प्रेमाने विचारावे" व तेही माणसे आहेत त्यांनाही कुटुंब आहेत,त्यांनाही जीव आहे ,

त्यामुळे सर्व ग्राहक ने समजून घेऊन नाहक कर्मचारी यांना फोन करून/वैयक्तिक मतभेदातून त्रास देऊ नये ही विनंती,सर्व अधिकारी व कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता वीज सेवा देण्यात गुंतलेले आहेत,त्यामुळे वीज बंद झाल्यावर कमीत कमी अर्धा तास तरी कोणालाही फोन करू नये किव्हा मेसेज द्वारे विचारणा करावी,यामुळे तो कामात असतो,फौल्ट च्या शोधत फिरत असतो,मटेरियल ची जुळवाजुळव करत असतो, याचे आठवण ठेवावे,कारण थोडा वेळ जरी घरात वीज नसली तर लगेच काही अडून बसत नाही पण तोच कर्मचारी देशावर आलेले संकट स्वतःचे समजू  तुमची रक्षा करणे साठी पुढील काही दिवस अहोरात्र जागणार आहे.

त्यामुळे सर्वांना विनंती आहे की देशावर आलेले भीषण संकट व त्याची जीवाशी येणारी तीव्रता लक्षात घेऊन सर्व ग्राहक ने समजूतदार पणाने घेऊन/वागून कोणत्याही कर्मचारी वर्गाला त्रास होणार नाही असे कृत्य करू नये व कर्मचारी हा आपला फॅमिली मेम्बर असून त्यालाही वेळ लागून शकतो,सकाळी तो घरातून जाईल तेव्हा संध्याकाळी घरी परत येईल की नाही याची देखील खात्री त्याला नाही अश्या आजाराशी त्यालासुद्धा सामना करायचा आहे,
तोही तुमचा  जीव वाचवत आहे त्यामुळे मानसिक खच्चीकरण करण्याऐवजी त्याला मानसिक आधार देऊन ,प्रेमाने विचारून, फक्त
 "वेळ लागला तर चालेल पण काळजी घ्या व काळजीपूर्वक काम करा,धन्यवाद"
एवढे जरी बोलले तरी चालेल
 व कुटुंबातील मेम्बर असे समजून सौजन्य दाखवावे व परिस्थिती नुसार सहकार्य करावे ही कळकळीची विनंती

कक्ष अभियंता महावितरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध