Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ मार्च, २०२०

चोपड्या शहरातील नागरिक सामजिक भान विसरले,कलम १४४ ला नागरिकांचा ठेंगा,


चोपडा प्रतिनिधी विनोद निकम
काल जनता कर्फ्यु दरम्यान चोपडयातील नागरिकांनी दाखवलेले सामजिक भान राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 

लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर चोपडा शहरात मात्र सकाळच्या सत्रात सामजिक भान विसरत कुठल्याच प्रकारचे गांभीर्य नागरिकांना दिसून आले नाही. सकाळी ९ वाजेच्यासुमारास शहरातील तहसील काचेरीजवळ, आझाद चौक,शिवाजी महाराज चौक ,मेनरोड येथे भाजीपाला ,दूध ,किराणा घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान नागरिक कोरोना वायरस संबंधी कुठलंही फिकीर दिसत नव्हती . मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या धारा १४४ चा कुठलाही धाक दिसत नव्हता.

     
चौकाचौकात जमलेली गर्दी पाहून चोपडा नगरपालिकेचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांनी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्या सह रस्त्यावर उतरत हातगाडीधारकाना हाकलून लावत पुन्हा हातगाडी लावू नये असे सांगत कारवाई करण्याची तंबी दिली.दरम्यान मेन रोडवर देखील काही दुकाने उघडण्यात आली होती ती देखील पुन्हा बंद करण्यात आलीत.तर पोलीस देखील या दरम्यान नागरिकांना पुन्हा घरातच राहण्याचे सांगताना दिसून आले. 

काही भागात  नागरिकाना अनेक वेळा सांगून देखील प्रशासनाला दाद देत नसल्याचे चित्र होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध