Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

११ वर्षीय मुलाचा संचारबंदीच्या काळात ह्रदय झडपेच्या विकराने मृत्यू ... अंत्यसंस्कारात मोजकेच नातलग सहभागी



रावेर-जळगांव प्रतिनिधी: शहरात दंगलीची व कोरोनाच्या शटडाऊनमध्ये संचारबंदी सुरु असतांना रावेर भोईवाडा परिसरातील एका ११ वर्षीय बालकाचा ह्रदयातील झडपेच्या विकाराने अकस्मात मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. 

मयत बालकाच्या कुटुंबियांनी त्यास मृत अवस्थेत दाखल केल्याने शवविच्छेदन करुन ह्रदयातील झडपेच्या विकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मयत कुणाल गणेश भोई (वय११वर्षे) असे या बालकाचे नाव असुन रविवारी पहाटे त्याचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्याला सकाळी रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक अधिकारी डाँ एनडी महाजन यांनी त्यास मृत घोषित केले. 

शहरात संचारबंदी सुरु असल्याने काही मोजक्या नातलगांना सोबत घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध