Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२०
जवाहर मेडिकल फाऊंडेशनतर्फे एस.आर.पीएफ मध्ये अस्थीरोग शिबीर
धुळे:प्रतिनिधी:जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातर्फे राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 6 च्या कॅम्पसमध्ये नुकतेच अस्थीरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अस्थीरोग विभागातील डॉ. अवनिश राय, डॉ. अभिजित शिरसाट यांनी तपासणी केली. परिसरात राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांनी या शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला.
हाडांशी निगडित आजार, जुने दुखणे, सांध्यांचे दुखणे, पाठदुखी, अपघाताचे दुखणे, माणक्यांचे आजार अशा सर्वच रुग्णांची तपासणी केली. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या शिबिरात पोलीस बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य त्या सूचना डॉक्टरांनी केल्या. जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे चेअरमन डॉ.भाईदास पाटील,सहसचिव संगीताताई पाटील, नेहल पाटील, डॉ.ममताताई पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, पीआरओ (प्रशासन) राकेश काकूस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले आरोग्य योजनेचे संदीप भामरे, रुग्णमित्र प्रवीण राजपूत, समाधान पाटील, लक्ष्मी चौधरी, प्रांजल गावित आदींनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले. एसआरपी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सर्वांचा सत्कार केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा