Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२०
राष्ट्रीय विज्ञान दिवस
प्रतिनिधी:या दिवसाच्या औचित्य साधून दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणपुर येथे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थी, पालक व तमाम नागरिकांच्या मनात विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, त्यातील रंजकतेचा वापर करून अंधश्रद्धा निर्मुलन करणे हाच या मागील प्रयत्न.
विविध सोपे प्रयोग विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने सर्वाना करून दाखवले. आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक भोंदू व्यक्ती आपल्याला फसवतात ही फसवणूक दूर करण्यासाठी यामागचे विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगणे व अंधश्रद्धा दूर करणे असा यामागचा छोटासा उद्देश. खरे बघता वय वर्ष सहा ते दहाच्या मधील या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरतांना अतिशय आनंद आम्हा सर्व शिक्षक बंधू-भगिनींना झाला.
आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शाळा नेहमीच विविध उपक्रम हाती घेत असते. आजच्या या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी गावाचे उपसरपंच श्री. अमृत पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद श्री. बाळकृष्ण पाटील, सर्व आदरणीय पालक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा