Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२०
खिर्डीतील किराणा दुकानदार घेताय ‘कोरोणा’बाबत काळजी !
खिर्डी प्रतिनिधी :कोरोणा व्हायरस हे जागतीक संकट भारतात पाय पसरत असल्यामुळे शहरापासुन ते गावापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.रावेर तालुक्यातील खिर्डी बु।। या छोट्याशा गावातील अत्यावश्यक सेवेत असलेले किराणा दुकानही याबाबतीत चांगलीच सतर्कता दाखवताना दिसत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून येथील गावातील सध्या दुकानांमध्ये कोरोणा व्हायरस बद्दल खुप प्रमाणात काळजी घेतली जात आहे असे दिसुन येत आहे.गावातील दुकानांच्या मालकांनी असे नियम बनवले आहे कि, जो पर्यंत एक गिर्हाईक दुकानातुन माल घेऊन जात नाहि तोपर्यंत, दुसर्या गिर्हाईकाला दुकानात प्रवेश नाही आणि जर गिर्हाईक जास्त झाले तर प्रत्येक गिर्हाईकामध्ये जवळ जवळ चार फुटाचे अंतर राहिल.
असे गोल मार्क करुन ठेवले आहे.यावेळी गावातील ‘निखिल प्रॉव्हिजन’ या दुकानाचे मालक अरुण चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली असता ‘अशाप्रकारे जनजागृती केली व काळजी घेतली तर खरच कोरोणा व्हायरसला आपण आळा घालू शकतो असे मत व्यक्त केले.त्या वेळी खिर्डी सर्कल मीना तडवी मॅडम,तलाठी फिरोज खान व तत्पर फाऊंडेशन चे सदस्य व आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा