Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२०
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपाय योजनांकरिता डी. पी. डी. सी. अंतर्गत
जळगांव जिल्ह्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर ! - पालकमंत्री गुलाबराव पाटील
तातडीच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जळगाव प्रतिनिधी: जळगाव दि.२९ कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक विकास योजनेतून 4 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून तातडीच्या उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यातच मेहरूण येथे एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमिवर, ना. गुलाबराव पाटील यांनी एक निवेदन जारी केले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा रूग्ण आढळला असला तरी तो बाहेरून आलेला होता. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण प्रशासन या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आधीपासूनच सज्ज असून आता तातडीने नवीन सामग्री खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हील सर्जन-जिल्हा रूग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासाठी विविध सामग्रीचा समावेश करण्यात आलेला आहे.
यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रौढ व बालकांसाठी इनव्हेसीव आणि नॉन इनव्हेसीव या दोन्ही प्रकारातील व्हेंटीलेटर्ससह अन्य सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये फेस मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदींसह अन्य सामग्रीचा समावेश आहे. ही सामग्री सुमारे २.४४ कोटी रूपयांचा आहे.
तर जिल्हा रूग्णालयाचे सिव्हील सर्जन यांच्यासाठी एकूण ७४.८७ लाख रूपयांची खरेदी करण्यात येणार आहे. यात उशी व गाद्यांसह बेड, पीईपी किट, सॅनिटायझर आदींसह अन्य सामग्रीचा समावेश आहे.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा आरोग्य अधिकार्यांसाठी सुमारे ५९.५६ लाख रूपयांची सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. याच्या मध्ये अल्कोहोलयुक्त सर्जीकल हँड सोल्युशन, ट्रिपल लेअर फेस मास्क, थर्मामीटर स्कॅनर आदींसह अन्य औषधींचा समावेश आहे.
या तिन्ही विभागांसाठी तातडीच्या उपाययोजना म्हणून या खरेदीला प्रशासनाने मान्यता दिली असून येत्या एक-दोन दिवसात जिल्ह्यातील जनतेसाठी ही सामग्री उपलब्ध होणार आहे. कोरोना विषाणूचा आपल्या सर्वांनी यशस्वीपणे प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण एकत्रीतपणे लढा देणार आहोत. यासाठी प्रशासन तर सज्ज आहेच पण याला यशस्वी करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. यामुळे आपण कोरोनाचा यशस्वी सामना करू असा नक्कीच विश्वास वाटतो असे ना. गुलाबराव पाटील यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा