Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२०
सामूहिक वनाधिकार प्रशिक्षण शिबीर संपन्न
प्रतिनिधी: रावेर:येथे वनांचल समृद्धी अभियान आयोजित सामुहिक वनाधिकार प्रशिक्षण शिबीर, रावेर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित,व्ही.एस.नाईक महाविद्यालय येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.पी. व्ही.दलाल यांच्या हस्ते भारत माता व स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुजनाने झाले.प्रास्ताविक वसाचे जिल्हा समन्वयक शुभम नेवे यांनी केले. ग्रामविकासाचे माॅडेल असलेल्या बारीपाडा गावावर आधारित चित्रफित सर्वांना दाखवली.तसेच प्राचार्यांनी मनोगत व्यक्त केले व जंगल संवर्धन व संरक्षण करणे ही काळाची गरज असुन वाढत्या ग्लोबल वार्मिंग ला आळा घालण्यासाठी कीती महत्त्वाचे आहे व वसा त्यासाठी प्रयत्नरत आहे तसेच सर्वांनी वसा संस्थेची या कामात मदत घ्यावी असे आपले मत व्यक्त केले.
जिल्हा समन्वयक शुभम नेवे यांनी वनहक्क कायदा मांडणी केली.
आपल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या दैनंदिन गरजा व आजच्या आधुनिक युगातील विकासाच्या वाटेवरचा वाटसरू करण्यासाठी वनांचल समृद्धी अभियान (वसा) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून कामकाज सुरु आहे.मनरेगा या योजनेच्या माध्यमातून संस्थेने जनसंपर्क अभियान राबवून रोजगाराच्या शोधात असलेल्या बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच त्या विषयी मनरेगा प्रशिक्षण शिबीर घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जनजागृती केली. पुढील टप्प्यात आम्ही सामुहिक वनहक्क प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरुन या प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून ज्या आदिवासी गावांना सामुहिक वनहक्क प्राप्त झाला आहे त्यांना त्या जंगलाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रवृत्त करीत व त्यातील गौण वनउपज च्या माध्यमातून त्यांचा उपजिविकेचा प्रश्नही सुटेल असा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रा.सी.पी.गाढे यांनी केले.
प्रशिक्षण शिबीराला जवळपास २५ गावांमधून आदिवासी बांधव व वनसंवर्धन विषयात आवड असणारे विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.याप्रसंगी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृह गृहपाल लता घाटे यांनीही उपस्थिती दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.व्ही.डी.पाटील व नबी तडवी यांनी परीश्रम घेतले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🛑 _अमळनेर : झोपडीला अचानक आग लागल्याने बोदर्डे येथील काशिनाथ दिलभर भिल या वृद्धाचे कुटुंब उघड्यावर आले असून संसार उध्वस्त झाल्याची घटना २...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर आगाराच्या शिरपूर-पुणे बसमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला अरेरावी करत बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स...
-
अमळनेर : चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ व आरोपीची सखोल चौकशी करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्...
-
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग अस...
-
शिरपूर प्रतिनिधी - पळासनेर शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरच्या दारूबंदी विभागाने सापळा लावत पर राज्यातील 27 बिअरचे बॉक्स जप्त करत द...
-
सध्या साक्री तालुक्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (Private Agriculture Markets) झपाट्याने सुळसुळाट होत असून, प्रत्येक गावाच्या कोपऱ...
-
धुळे,नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात द...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा