Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

वाघाडीत गरीब वस्तीमध्ये भाजपातर्फे भोजन वाटप



शिरपूर-प्रतिनिधी तालुक्यातील वाघाडी येथे भाजपा शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांनी गरीब वस्तीमध्ये भोजन वाटप केले. कोरोना या विषाणूने जगात थैमान घातलेला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पुर्ण देश लॉकडाऊन केल्याने गोर गरिबांना उदरनिर्वाहासाठी बाहेर जाणं शक्य नसल्याने त्या अनुषंगाने शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष  किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाघाडी भाजपा शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांचा वतीने येथील गरीब वस्तीमध्ये दि.३०/३/२०२० रोजी संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी माजी सरपंच उमाकांत पवार, लोटन कोळी, पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील माळी, जगन्नाथ पाटील, भटू पाटील, गुलाबराव पाटील, प्रभाकर जगताप व भाजपा कार्यकर्ते यांनी भोजन कार्यक्रम आयोजनात सहभाग घेतला होता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध