Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

देशवासियांनो, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सतत सतर्क राहु या... श्री अर्जुनभोई



मुंबई प्रतिनिधी:आपल्या देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात आला. वास्तवात या २४ घंट्यांत तिसर्‍या टप्प्यात जाण्याच्या आधी विषाणूंची वाट अडवायची होती आणि त्याचा सर्वांत सोपा मार्ग हाच होता की, सार्वजनिक संपर्क, आदान-प्रदान बंद करणे... अन् १३० कोटींचा हा देश घरातच थांबला या देशाची एक अब्ज जनता दिवसभर स्वत:ला घरात कोंडून घेते, हे जगासाठी नक्कीच आश्‍चर्य कारक आहे. 

त्यामुळे वाईटाची एक साखळी तुटण्यास आम्हाला साहाय्य होत आहे. जगभरात साथ-संसर्गाने पसरणार्‍या रोगांवर मात करण्याची सर्वांत प्रभावी उपाययोजना म्हणून समाज प्रबोधनाकडे पाहिले जाते. कोरोना विषयी जनजागृती झालीच, तसेच ‘काय करावे ?’, ‘काय करू नये ?’, याचीही माहिती एकाच वेळी अनेकांना मिळाली. एका जनता कर्फ्यूने कोरोनापासून मुक्ती मिळेल, असे नाही तर ‘वर्क फ्रॉम होम’चा कर्मचारी आणि उद्योगसमूह या दोघांनाही लाभ होईल. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साथीचे रोग पसरण्याचा धोका कमी होईल. त्यासाठी आपण पुन्हा तत्पर राहु या आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य यांना आपल्या उम-याच्या आत सुरक्षित ठेऊ या आणि आपला संपूर्ण देशही सुरक्षित करु या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध