Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

गॅलेक्सी गृपच्या वतीने सावळदे व पंचक्रोशीत माेफत मास्क व सॅनिटाइजर चे वाटप!




कुरखळी प्रतिनिधी : सावळदे ता. शिरपुर येथे गॅलेक्सी गृपच्या वतीने काल दि. २९ राेजी, संध्याकाळी थाळनेर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या हस्ते गावात व पंचक्रोशीत मास्क, सॅनिटाइजर, साबण चे माेफत वाटप करण्यात आले. 

यावेळी पी. एस. आय. नवनाथ रसाळ, पाे. काॅ. सिराज खाटीक, पाे. काॅ. मालचे, गॅलेक्सी गृपचे अतुल राजपूत, सचिन राजपूत, श्रीपाल राजपूत तर पिंप्री चे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, कुरखळीचे पाेलिस पाटील वसंत बिल्हाडे, आढेचे पाेलिस पाटील राजकिरण राजपूत, पत्रकार याेगेश माेरे कुरखळी, रविंद्र राजपूत उपस्थित हाेते. 

जागतिक महामारी काेराेना विषाणू मुळे संपुर्ण देशात लाॅकडाऊन घाेषीत करण्यात आला आहे. राज्यात कलम १४४ नुसार संचारबंदी चालु आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढु नये. तसेच ग्रामीण जनतेला काेराेना सारख्या गंभीर विषाणू बाबत खबरदारी बाळगता यावी. यासाठी जनजागृती साेबतच प्रादुर्भाव राेखण्याची साधने महत्वाची असल्याने सावळदे येथील गॅलेक्सी गृपचे अतुल राजपूत व सचिन राजपूत यांच्या वतीने प्रत्येक घरी फक्त दोन व्यक्ती जात जनजागृती साेबत मास्क, सॅनिटाइजर, साबण देत अाहेत. 

काेराेना बाबत काळजी, लक्षणे, हेल्पलाईन नंबर आदी विषयांवर गाेरगरीब जनता, गावातील आदिवासी वस्ती वर जावुन मार्गदर्शन करीत आहेत. 

यावेळी कुरखळी येथे सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन साळुंखे व गॅलेक्सी गृपच्या वतीने मास्क, सॅनिटाइजर वापराचे प्रात्यक्षिक दाखवुन लाेकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच पाेलिस वाहनातुन गावातील नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये, गावात घाेळका करून उभे राहू नका, साेशल डिस्टन्स पाळा, कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता गरज भासल्यास पाेलिस पाटील, किंवा पाेलिस ठाण्यात संपर्क साधा अशा सुचना केल्या तर सावळदे येथील सचिन राजपूत यांच्या वतीने कुरखळी येथे देखील मास्क, सॅनिटाइजर व साबण देण्यात आले. यावेळी सावळदे येथील युवा व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. तर अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाचे काैतुक केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध