Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

जळगाव महापालिकेतर्फे भिलपुरा इस्लामपुरा भागात निर्जतुकीकरणासाठी फवारणी




जळगाव प्रतिनिधी: कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात निर्जतुकीकरणासाठी फवारणी सुरु आहे.

सामाजिक बांधीलकी म्हणून जैन इरिगेशनने महापौर भारतीताई सोनवणे आणि नगरसेवक
कैलासअप्पा सोनवणे यांच्या विनंतीवरून जैन कंपनीने आपल्याकडील अग्निशामक यंत्रावर (फायर फायटर) स्प्रे करण्याची खास यंत्रणा
कार्यान्वित करुन महापालिकेस उपलब्ध करून दिले आहे. 

या यंत्रात असलेल्या स्प्रेद्वारे १००
फूट अंतरापर्यंत फवारणी केली जाते. त्यामुळे कमी कालावधीत शहराच्या अधिक भागात हे निर्जतुकीकरण करणे शक्य होणार आहे. 

आज भिलपुरा,इस्लापूरा,काट्याफैल परिसरात निर्जतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली.

या वेळी महापौर सौ भारती ताई सोनवणे,नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे, सैय्यद शाहिद (मेंबर), अल्ताफ  भाई,सैय्यद इम्रान,शाहिद नासिर खान, इरफान हाजी उपस्थित होते.

परीसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी, घराबाहेर निघू नये असे आवाहन महापौर सौ भारती सोनवणे यांनी केले..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध