Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

१३ मार्चला खेळ आयुष्याचा हा चित्रपट होणार महाराष्ट्रात प्रदर्शित



धुळे:प्रतिनिधी:खेळ आयुष्याचा हा चित्रपट १३ मार्चला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने धुळे शहरात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी चित्रपट निर्माती. सुनिता ताई उघडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की हा चित्रपट एका अत्याचार झालेल्या स्त्रीची सत्यकथा असून आयुष्य तस जगणं, सर्वसामान्यांना तसेच कोणालाही फार कठीण होवून बसले आहे 
नेहमीच कुठले ना कुठले संकट आ वासून उभी रहात असतात. सकाळी उठताच आपण हाॅफिसला वेळेवर पोहचू का ?
रस्त्यावरचे खड्डे ,लोकलचा जीवघेणा प्रवास, आपण साठवत असलेली मिळकत बॅकेत सूरक्षित आहे का ? मुलांचे भवितव्य, याच विचारांनी दिवस त्याचा संपून जात असतो. तरीपण हा शारीरिक त्रास सर्वजण सहन करू शकतात पण मानसिक ? या आयुष्यात कधी काय होईल ते सांगता येत नसते, कधी कधी काहीजण
शारीरिक व मानसिक अत्याचारने खचून जात असतात, असाच एक संवेदनशील विषय घेवून आर. के. एम प्रॉइक्शन बॅनरखाली निर्मिती झालेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट शुक्रवार दि. १३ मार्चला महाराष्ट्रातील सर्वत्र १४७ थेटर मध्ये एकाचवेळी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका अत्याचार झालेल्या स्त्रीची सत्यकथा आहे या चित्रपटाच्या निर्माती सुनिताताई
उघडे व दिग्दर्शक प्रकाश नारायण जाधव यांनी पडद्यावर मांडली आहे.   
 
गौरव ठाकरे हे कार्यकारी निर्माता 
म्हणून काम पहात आहेत.

खेळ आयुष्याचा सोलापूर जिल्ह्यातील शरमीम शेखची सत्यकथा, अभ्यासात हुशार, इतिहासाची आवड, बालपण आजी आजोबांकडे अतिशय सुंदर गेलेल, शाळेतल्या ग्रूप बरोबर गड किल्ले बघायला जाते आणि या गडात तिचे आयुष्य बदलून जाते. तिथे तिच्यावर शारीरिक अत्याचार होतात, समाजाला तोंड देत, न्यायालयाचा दरवाजा ठोठावते, पण तिला न्याय मिळतो काय ? शारीरिक अत्याचारापेक्षा न्यायालयात,समाजात तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जातात. तरी ती खंबीरपणे उभी रहाते. अशा बरऱ्याच शरमीम असे जीवन व्यतीत करीत आहेत. काहींना अजूनही न्याय मिळालाही नसेल. अत्याचारी मोकाट फिरत असतील. मी लेखिका नाही. 

पण या शरमीमला मी खूपच जवळून बघितले आहे. तिच्या वेदना, तिचा टाहो माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आहे. मी ज्या शर्मीमला पाहिले ते कागदावर लिहीत गेले, असे निर्माती सुनिताताई उघडे यांनी संगितले, चित्रपटाला उशीर झाला, पण माझे स्वप्न पूर्ण केले. भी बऱ्याच चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. 

पण हा चित्रपट करताना मी स्वत: भावुक झाले होतो. असे दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी संगितले. आईची माया, देवता, माझ सौभाग्य, बाळ भीमराव हे मराठी, एस. पी. खान, एक नई क्रांति, हा हिन्दी व काही भोजपुरी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत
पटकथा, सुरेश ठाणगे, गीत
सुनिताताई उघडे, संगीत. मोनु अजमेरी, छायांकन. शांताराम भोसले, संकलन. बशीर मोमीन यांचे आहे. खेळ आयुष्याचा या चित्रपटात प्रतिक्षा जाधव, राज सेठ, प्रेमा किरण, सुरेखा कुडची, जयराम कुलकर्णी, पराग चौधरी यांच्यासह बऱ्याच कलाकारांच्या भूमिका आहेत. 

चित्रपटातल्या शरमीमने आपल्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध कसा लढा दिला कारण अशा शर्मीम समाजात वावरत असतात, समाजात वावरतांना मुलीनी भान
ठेवून वागले पाहिजे आणि सर्वांनी आवर्जुन हा चित्रपट पाहावं, अशी कळकळीची विनंती निर्माती सुनिताताई उघडे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध