Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० मार्च, २०२०

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील अशिक्षित महिलेने घडविले दोन मुलांना अधिकारी


शिंदखेडा:प्रतिनिधी:महिला दिनानिमित्त भडणे येथील जिजाबाई दिलीप पाटील या महिलेचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला भडनेहे गाव चार हजार लोक वस्तीचे आहे गावात बरेच अधिकारी झाले असून मात्र भडणे येथील जिजाबाई दिलीप पाटील व दिलीप दोधू पाटील या शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय वर आपला उदरनिर्वाह सांभाळून स्वतः पती-पत्नी अशिक्षित आई-वडिलांचे चौथीपर्यंत शिक्षण तेही अपूर्णच पाटी आणि पुस्तक नको वाटणारे व दोन हात दूर असे आई वडिलांचे जीवन होते शेतात प्रपंचओडूनमुलांचे शिक्षण ना साठी कस्टमय जीवन संघर्षातून आपल्या मुलांवर आपली सारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून त्यांना शाळा पुस्तक यांचे 

लहानपणापासूनच आईने शिक्षणासाठी गोडी निर्माण करून दोघं मुलांना शिक्षणात कुठलीच उणीव भासू दिली नाही कष्टमय जीवन करूनपै पैसा गोळा करून त्यांना शिक्षणासाठी मेहनत घेतली मुलांनीही आईच्या या कष्टमय जीवनाची कदर करून शिक्षणात प्रावीण्य मिळवत प्रत्येक वर्षी चांगली कामगिरी करून एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले यात 

पहिला मुलगा एसटीआय दुसरा मंत्रालयात लागल्याने आपल्या जीवनाचे यशाचे फलित मिळाल्याचे ते सांगतात शिक्षण पूर्ण करून त्यांना वर्ग 2 अधिकारी केले स्वतः त्यांची आई जिजाबाई दिलीप पाटील अशिक्षित व वडील दिलीप पाटील चौथीपर्यंतचे शिक्षण तीही अपूर्ण अश्या अशिक्षित कुटुंबातून मुलांना कुठलीही क्लास न लावता जिद्द व चिकाटी उराशी बाळगून दोघं मुलांचे शिक्षण एमपीएससी परीक्षा घेऊन ते चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले आज प्रमोद पाटील एसटीआय तर दुसरा कपिल पाटील सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आहेत आई-वडिलांना शिक्षणाचे कुठलीही गोष्ट लक्षात नाही मात्र मुलांना अधिकारी करायचेच हा मूळ मंत्र उराशी बाळगून काबाडकष्ट करून दोघे मुलांना पैसा पैसा गोळा करून अधिकारी बनवले त्या मातेला आज महिला दिनानिमित्त शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील भडने येथील पोलीस पाटील युवराज माळी आदी मान्यवरांनी अशिक्षित महिलेने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर स्वतः न शिकता आपणही आपल्या मुलांना शिक्षणात मागे न राहू देता त्यांचे शिक्षण पूर्ण करून अधिकारी बनवल्यामुळे आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने समाधान असल्याचे भावना व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध