Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
प्रणिता मिटकर यांची निवड
प्रतिनिधी:अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा महिला व बाल संस्कार प्रमुख म्हणून प्रणिता मिटकर यांची निवड करण्यात आली.
प्रणिता मिटकर या एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.भटके-विमुक्तातील मुलांसाठीचे त्यांचे कार्य, किशोरी विकास मेळाव्यातून मुलींसाठी आयोजित केलेली प्रशिक्षण वर्ग, दासबोधाच्या माध्यमातून महिलांमध्ये केलेली जनजागृती,वात्सल्य सामाजीक संस्थेच्या मार्फत पाणी,गोसेवा,वृक्ष संवर्धन यात केलेली कामे या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे,या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती केल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले.उस्मानाबाद येथील यशराज मंगल कार्यालय येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.ॲड. दिगंबर महाराज खोत व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा