Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

देव आला धावूनी गरीबांच्या मदतीला.....मा.श्री.परेशभाई कोळी



आपल्या अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा नेते व महाराष्ट्र राज्याचे युवा राज्य अध्यक्ष मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब यांच्या कार्याला मानाचा मुजरा....

वैश्विक महामारी करोना-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थित संचारबंदी कलम १४४ आणी सोशल डिस्टंसिंग मुळे ठाणे येथील चेंदणी कोळी वाडा पश्चिम,सिडको बसस्टॉप जवळील बोगद्या जवळ रेल्वे चे काम गेल्या कित्येक दिवसांपासून चालू होते,त्या कामासाठी लागणारे मजदूरवर्ग हा मध्यप्रदेश,बिहार,युपी,उत्तरांचल प्रदेशातून आलेले आहेत परंतू सर्व देशात कोरोना-१९ च्या प्रादुर्भावाने २१ दिवसांचा लाॅकडाउन असल्याने या शेकडो रेल्वे कामगार कुटुंबियांवर (मजुरांवर) उपासमारीची वेळ आलेली होती त्यात त्यांचा संबंधित ठेकेदार(काॅन्ट्रक्टर)त्यांना अशा परिस्थित वार्यावर सोडून पसार झाला.

या घटनेची माहीती कोळी समाजाचे युवा नेते मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी यांना समजताच त्यांनी लागलीच धाव घेतली व सर्व शेकडो कुटुंबियांची आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना राहण्यासाठी ठाणे येथील कोळी समाजाचे सभागृह उपलब्ध करून दिले व त्यांना दोन वेळेची जेवणाची व्यवस्था करून दिली व जो पर्यंत त्या सर्व कामगारांची पर्यायी व्यवस्था होत नाही तो पर्यंतची सर्वांची अन्न,पाणी व निवारा या तिन्ही गोष्टींची जबाबदारी मा.श्री.परेशभाई कोळी यांनी घेतली आहे.

परप्रांतिय रेल्वे कामगारांच्या शेकडो कुटुंबियांना उघड्यावर सोडून पडून गेलेल्या ठेकेदारावर शासनस्तरावर कार्यवाही व्हावी यासाठी मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्वाईन सी पी साहेब,डि एस पी साहेब  यांना भेटून त्या मजूर वर्गाच्या समस्या त्यांचे निर्देशनास आणून देत सविस्तर चर्चा केली या कार्यक्रमाला स्वतः ज्वाईन सी पी साहेब,डि एस पी साहेब हजर राहून त्यांचे हस्ते शेकडो कुटुंबियांना जेवनाचे वाटप करण्यात आले तसेच सर्व प्रकारचे अन्नधान्य,कडधान्य,तेल,किराणा साहित्य देण्यात आले.

मा.श्री.परेशभाई चे कार्य आकाशाला गवसणी घालण्या सारखे आहे,त्यांच्या या कार्याची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे,अश्या आमच्या नेत्याला मानाचा मुजरा.....

संकलनः-अनिलदादा नंन्नवरे,खांदेश विभाग उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवा कार्य अध्यक्ष,अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि)शाखा महाराष्ट्र प्रदेश


1 टिप्पणी:

प्रसिद्ध