Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ मार्च, २०२०
जमावबंदी च्या काळात जमीयत कडून शेगावात अन्नदान
शेगाव:प्रतिनिधी:अस्मानी संकटात असलेल्या कोरोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केलेला असून या काळात सर्व हॉटेल आणि वाहतुकीचे साधन बंद करण्यात आल्याने रस्त्याच्या कडेला असलेले भिकारी आणि प्रवाशांना शेगाव येथील जमियत उलमा ए हिंद कडून अन्नदान करण्यात आले.
जमियत चे संस्थापक अध्यक्ष अर्षद मदनी यांच्या निर्देशानुसार आपापल्या शहरांमध्ये उद्भवलेली परिस्थिती पाहता जमियत उलमा ए हिन्द च्या कार्यकर्त्यांनी समोर येऊन रस्त्याच्या कडेला असलेली भीक मागणारी मंडळी, रेल्वे स्थानक बस स्थानक रुग्णालय परिसरात असलेली गरीब मंडळी आणि आवश्यकता असलेल्या प्रवाशी आणि व्यक्तीजवळ पोहोचून त्यांना जमावबंदीच्या काळामध्ये जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश मिळाल्या नुसार पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यावेळी पुलाव तयार करून शेगाव शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, कृषी उत्पन्न बाजार समिती, रुग्णालय परिसर, मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यावर भीक मागणाऱ्या व्यक्तींकडे पोहोचून त्यांना जेवणाचे पॅकेट पुरविण्यात आले.
याशिवाय सर्व वाहतुकीची साधने बंद असल्याने रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात अडकून पडलेल्या मंडळींनाही जेवण वाटप करण्यात आले. याच प्रकारे जमियत उलमा ए हिंद यांचा आदर्श घेऊन ईतर सामाजिक संस्थांनी आपापल्या परिसरातील गरजू व्यक्तींना सहकार्य करावे असे आवाहन तरूण गर्जणा तर्फे करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा