Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२०

रावेर तालुक्यातील सावदा येथील नगरसेवक अल्लाहबक्ष यांनी केले प्रभागात तांदूळ वाटप


     
           
कोरोनामुळे शहरात  संचारबंदी लागू करण्यात आली आहे, गेल्या आठ दिवसापासून लोक घरातच थांबून असून हाताला काम नसल्याने घरातील अन्न सेवन करीत असून त्यासंदर्भात सावदा नगरपालिकेचे अपक्ष  नगरसेवक  अल्लाहबक्ष शेख नजीर यांनी जागृत होऊन आज दिनांक २७ रोजी दुपारी ४  वाजता वार्ड नंबर ३ मध्ये संपूर्ण वार्डात स्वतः फिरून प्रति माणसी घराची लोकसंख्या बघून  प्रत्येकी एक किलो तांदूळ वाटप प्रतिमांशी केले

सावदा येथे वार्ड नंबर तीनशे नगरसेवक अल्लाबक्ष शेख नजीर यांनी खाजा नगर ,जमादार मोहल्ला, बुधवारा ,चांदनी चौक भिलवाडा, तेलीवाड़ा, इस्लाम पुरा इत्यादि
संपूर्ण वार्ड नं ३ मध्ये  प्रति माणसी एक किलो तांदुळाचे वाटप केले त्यांनी हे वाटप स्वतः संपूर्ण वार्डात फिरून केले व नागरिकांत कोरोना  बाबत जनजागृती केली यावेळी संपूर्ण  वार्डात त्यांनी सरकारी  धोरणा संदर्भात घरातच राहण्याच्या सूचना सर्व नागरिक बंधू-भगिनींना दिल्या या उपक्रमाने नगरसेवक अल्लाबक्ष यांचे नागरिकांनी कौतुक केले




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध