Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन संस्थेने दिले निवेदन ,पोलिस प्रशासनाला तसेच गावकर्यांना मास्क चे वाटप.....


खिर्डी प्रतिनिधी(सा.वा.):-दि.27 कोरोना व्हायरसच्या प्रसारावर मात करण्यासाठी लॉक डाऊन झाल्याने खिर्डी गावात संचारबंदी सुरू आहे.

तसेच निंभोरा पोलिस स्टेशन ला कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुले तसेच या कोरोना पाश्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून त्यांच्या मदतीसाठी खिर्डी व खिर्डी परिसरात नावाजलेली सामाजिक संस्था 'तत्पर फाउंडेशन'त्यांच्या मदतीसाठी पोलीस मित्र म्हणून काम करण्याची संधी दयावी यासाठी तत्पर फाउंडेशन सामाजिक संस्थेकडून निवेदन देण्यात आले आहे.या आणीबाणीच्या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य व गावातील स्वयंसेवक बंदोबस्त ठेऊ शकतील.

त्यामुळे पोलिस  प्रशासनाने यासाठी संधी दिल्यास आम्ही काम करायला तयार आहोत असे निवेदनात नमूद केले आहे.शुक्रवारी तत्पर फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना हे निवेदन देण्यात आले आहे.या प्रसंगी गुणवंत पाटील ,चंद्रकांत कोळी,प्रवीण धुंदले,प्रभाकर महाजन, प्रदीप महाराज,शेख इद्रिश,रितेश चौधरी,सादिक पिंजारी, खिर्डी बुद्रुक येथील माजी पोलीस पाटील, आदींनी पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीची तयारी दाखवली. तसेच कोरोना रोखण्यासाठी पोलीस  प्रशासनाला व गावकर्यांना तत्पर फाउंडेशन या सामाजिक  संस्थे तर्फे मास्क चे मोफत करण्याप्रसंगी खिर्डी मंडळ अधिकारी मिना तडवी मॅडम,निंभोरा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाणकार साहेब, तलाठी एफ एस खान, सरपंच किरण कोळी,ग्रामविकास अधिकारी सोनवणे,खिर्डी बुद्रुक पोलीस पाटील अरुण पाटील,खिर्डी खुर्द पोलीस पाटील प्रदीप पाटील, आरोग्य विभागाचे डॉक्टर चंदन पाटील व तत्पर फाउंडेशन अध्यक्ष गुणवंत पाटील,उपाध्यक्ष ,चंद्रकांत कोळी,सचिव प्रवीण धुंदले,पत्रकार प्रदीप महाराज आदींसह तत्पर फाउंडेशन चे सर्वं संचालक मंडळ  फोटो:- निंभोरा पोलीस स्टेशन चे खिर्डी बीट अधिकारी अनवर तडवी यांना मास्क देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध