Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

सावद्यात स्वयंसेवी संस्था आल्या पुढे संचारबंदी मुळे रोजगार नसलेल्या नागरिकांना केले जेवण वाटप


रावेर तालुक्यातील सावदा येथील
कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू असून काही परप्रांतीय चालक व सहचालक , भटके गावोगाव हिंडणारे ,संचारबंदी मुळे रोजगार नसलेले,परिसरात अडकून पडले आहे त्यांच्या जीवनमानावर परिस्थितीवर परिणाम झाला आहे अशात काही भटक्यांना त्यांना पोट भरण्यासाठी फिरून काहींना भूक भागवावी लागते पण संचार बंदीमुळे आजमितीस ते पण ते करू शकत नसल्याने शहरात  आमदार चंद्रकांत पाटील बहुउद्देशीय मंच व शिवसेना शाखेतर्फे आज त्यांना जेवणाचे वाटप करण्यात आले यावेळी तालुका उपप्रमुख श्याम पाटील ,माजी नगरसेवक लाला चौधरी,  शहर प्रमुख मिलिंद पाटील ,युवा जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी ,माजी नगरसेवक फिरोज लेफ्टी ,शरद भारंबे ,अक्षय माळी आकाश चांदवे,राकेश बोराखडे , मंगेश माळी चेतन माळी,यांच्या हस्ते एक बिस्कीट पुडा व जेवणाचे वाटप आज त्यांना करण्यात आले 

      
सावदा नगरपालिका व देवा मसाले यांच्यातर्फे ही आज परराज्यातील ट्रकचालक व सहचालक यांना व भटक्यांना आज भाजी व पोळी  चे वाटप करण्यात आले देवा मसाले  चे संचालक  अजय चौधरी  व मीनाक्षी चौधरी हे दररोज दोघ वेळ सकाळ संदयकळी पन्नास लोकांना जेवणाची व्यवस्था करणार आहे असा त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे जोपर्यंत संचारबंदी आहे तोपर्यंत दोन  वेळचे पन्नास लोकांचे जेवण भाजी-पोळी यांना वाटप करतील हे वाटप देवा मिक्स मसाले व सावदा नगरपालिका यांच्यामार्फत केले 

जाईल त्यामुळे परराज्यातून अडकून पडलेल्या चालक सहचालक व भीक मागून पोट भरणारे भटके यांचा हा प्रश्न सुटत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध