Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

सावळदे येथे गॅलेक्सी गृप कडून माेफत पाणी व भाजीपाला वाटप!




कुरखळी प्रतिनिधी सावळदे येथील गॅलेक्सी गृपचे संचालक अतुल राजपूत, सचिन राजपूत, श्रीपाल राजपूत या बंधूनी सावळदे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आज माेफत बाटली बंद पाण्याचे वाटप केले.!
जगासमोर काेराेनाचे संकट लक्षात घेता माणुसकीचे नाते जपत प्रवाश्यांना आपल्याकडून किमान पाणी तरी मिळावे ह्या हेतूने ५००० पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले. 

तर राेज सावळदे गावात वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला "फार्म टू हाेम" माेफत वाटप करून गाेरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांना दिलासा दिला आहे. अनेक शेतकरी बांधवांचा भाजीपाला खराब न होऊ न देता स्वता मजुरी व गाडी भाडे देवुन माेफत वाटप करीत आहेत.

तर आज पाण्याची तृष्णा भागल्याने अनेक प्रवाश्यांनी व वाहनचालकांनी आभार मानले. तर अनेकांच्या डाेळ्यात अश्रू आले. कारण गरजेपोटी महामार्ग क्रमांक ३ वर जीवनावश्यक वस्तु जादा दराने विकल्या जात आहेत. काही माणुसकी विसरून केवळ जादा पैश्याचा हव्यास करीत आहेत. 

मात्र महामार्गावरून माेठ्या प्रमाणावर मजुरांचे स्थलांतर हाेत असल्याने वाहने खचाखच भरून मजुरांना नेले जात आहे. केवळ लवकर अंतर कापुन घरी पाेहचायचे असल्याने ना अन्न, ना पाणी अशी अवस्था मजुरांची झाली. मात्र गॅलेक्सी गृपच्या वतीने प्रत्येक वाहन थांबवुन काेराेना विषाणूची सुरक्षितता लक्षात घेवून पाण्याचे वाटप करण्यात आले . 

याकामी पिंप्रीचे पाेलिस पाटील तथा पत्रकार जयपालसिंह गिरासे, कुरखळी ग्रामसर्वांगीण विकासमंचचे प्रमुख योगेश्वर माेरे, सावळदे येथील नितीन जगदेव, गेंदा भिल, सुनिल भिल, पिंटू साेनवणे, उत्तम साेनवणे, सागर दाेरीक, नितीन पवार, रतिलाल भिल, सुरेश काेळी, मास्तर जगदेव, जिभाऊ जगदेव, मुकेश पवार, सचिन जगदेव, विनाेद साेनवणे, अशाेक काेळी, याेगेश काेळी यांच्यासह सर्व युवा मित्रमंडळ, जेष्ठ, श्रेष्ठ व ग्रामस्थ मंडळी सावळदे यांनी अनमाेल सहकार्य केले. 

घरी रहा... सर्तक रहा... सुरक्षित रहा...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध