Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२०

एक दिया शहिदो के नाम (शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्य युवा परीषदेचा स्तुत्य उपक्रम)




संपूर्ण विश्व कोरोना महामारीशी झुंज देत असतांना छत्तीसगड मध्ये नक्षली हल्ल्यात कोब्रा बटालियनचे 17 जवान शहीद झाले तसेच आज 23 मार्च शहीद दिनानिमित्त भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य युवा परिषद तालुका अक्राणीने अक्राणी तालुक्यात एक दिया शहिदो के नाम हा उपक्रम राबवला.कोरोना महामारीला आळा बसावा ह्या साठी राज्यात शासनाकडून लावलेला जमावबंदी कायदा 144 चे पालन करून शहीदांसाठी एक दिवा प्रत्येक परिवाराने कुठलाही जमाव न करता आपापल्या घरी लावावा असे आवाहन राज्य युवा परिषद तालुका अक्राणीने केले होते.महाराष्ट्र राज्य युवा परिषद तालुका अक्राणीचे आवाहन तालुक्यातील बऱ्याच परिवाराने स्विकारत एक दिया शहीदो के नाम ह्या उपक्रमात सहभाग घेवून एक दिवा आपापल्या घरी लावून शहिदांना भावपूर्ण

श्रद्धांजली वाहिली

उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व परिवाराचे महाराष्ट्र राज्य युवा परिषदेचे तालुका समन्वयक जितेंद्र दिलीप ढोले यांनी देशहितासाठी कोरोना महामारीशी झुंज द्यायला तयार रहा असा संदेश देत उपक्रमात सहभागी झालेल्या परिवारांचे आभार सोशल मीडियाद्वारे मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध