Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२०

फैजपुरात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आजाराची लागण होण्याची भीती


फैजपूर:प्रतिनिधी: शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील विद्यानगर भागात दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने डायरीयासदृश साथीच्या आजाराची लक्षणे काही नागरीकांना जाणवल्यानंतर संतप्त रणरागिणींनी गुरूवारी पालिकेवर धडक दिली. 

यावेळी या नागरीकांनी दुर्गंधी युक्त पाण्याची बादली मुख्याधिकारी यांच्यासमोर ठेवून आपला संताप व्यक्त केला. फैजपूर शहरात कोराना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून पालिकेकडून शहरात साफसफाई व फवारणीवर भर दिला असतांना गुरुवारी  विद्यानगर भागातील 

महिला व नागरीकांनी पालिकेवर धडक देत त्यांच्या भागात काही दिवसांपासून दुर्गंधी युक्त व काळा पाणी येत असल्याची ओरड करत पाणीपुरवठा विभागात बसलेल्या मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या टेबलावर दुर्गंधी युक्त पाण्याची बादली ठेवून संताप व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध