Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीची वेळ व ठिकाण ठरविले,अंमल बजावणी दि.२९ पासून
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीची वेळ व ठिकाण ठरविले,अंमल बजावणी दि.२९ पासून
शिरपूर (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात दिनांक २५ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागू केलेला आहे.बंदच्या काळात किराणा,भाजीपाला/फळ,दुग्धालय,औषधालाय आदी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये संपर्क साखळी खंडित करणेकामी शिरपूर वरवाडे नगरपरिषने व्यापारी व नागरिकांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी, निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेत उपलब्ध करून देण्याचे आवाहन व्यापारी व नागरिकांना शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने केले आहे.पुढील आदेशपर्यत जीवनावश्यक वस्तू नमूद केलेल्या ठिकाणी व वेळेत विक्री व खरेदी केली जाणार आहे.
शहरातील किराणा दुकान सकाळी १० वा. ते १२ वा पर्यंत उघडले राहणार आहे. तर भाजीपाला/ फळ तसेच शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दि. २९ मार्च २०२० पासून नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ६० ठिकाणी ओपन स्पेसमध्ये एका ठिकाणी ४ भाजीपाला विक्रेते व एक फळविक्रेता याप्रमाणे सकाळी १० वा. पासून दुपारी १२ पर्यंत दोन तास व्यापारी व नागरिकांना खरेदी विक्री करण्यात येणार आहे
तर दुध विक्रेते दररोज सकाळी ६ वा. ते ९ वा. व सायंकाळी ५ वा. ते ७ वा. या दरम्यान शहरात दूध पुरवठा करणार आहेत तसेच मेडिकल दुकान (दवाखान्याशी संलग्न असलेले सोडून) दररोज सकाळी १० वा ते १२ वा. पर्यंत आणि दुपारी ४ ते ६ वा. पर्यंत उघडे राहणार आहेत यासाठी नगरपालिकेने नियोजन केले आहे याची नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिरपूर वरवाडे नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासन यांनी दि. २३ मार्च २०२० पासून संचारबंदी आदेश लागू केल्याने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २४ मार्चच्या मध्य रात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.असे आवाहन शिरपूर वरवाडे नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा