Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२०
जीवनावश्यक वस्तुंचा साठेबाजी करु नका : जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ
धुळे-प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे.
मा. जिल्हा दंडाधिकारी धुळे यांनी सुद्धा दिनांक:22/03/2020 रोजी संपूर्ण धुळे जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहेत. या आदेशातून जीवनावश्यक वस्तू जसे की गहू, तांदूळ, डाळ, कडधान्य, खाद्यतेल, दूध, बेकरी पदार्थ, फळे व भाजीपाला इत्यादी वस्तुंना वगळले आहे.
धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुरेल इतका अन्नधान्य साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच शासनाने एप्रिल मे व जून महिन्याचे धान्य एकदाच वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच FCI मधून सुद्धा धान्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी सर्व रास्त भाव दुकानदार, धान्याच्या घाऊक व अर्ध घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना, खाद्यतेल व डाळींचे व्यापारी व इतर जीवनावश्यक वस्तूचा व्यापार करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना आवाहान जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे या अडचणीच्या काळात आपण या सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात.
तसेच या काळात कोणत्याही प्रकारचे साठेबाजी करू नये. वस्तूंचे कृत्रिम भाव वाढवून नफे खोरी करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. साठवणूक केल्यास किंवा अवाजवी भावात विकल्यास आपल्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा साथ प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा इत्यादी कायद्यान्वये कठोर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी व सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहान ही जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ धुळे यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा