Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२०
कुरखळी गावात १७ नागरिकांची नोदणी करून तपासणी करण्यात आली.
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
कुरखळी परिसरातील मुबंई, पुणे, नाशिक अशा विविध शहरांमधून नोकरी किंवा काही कामधंदा निमित्ताने बाहेरगावी गेलेले लोक आता गावाकडे परत येत असल्याने ग्रामस्थ व घरच्या लोकांनी दवाखान्यात जाण्यास प्राधान्य देत असून गेल्या चार दिवसांपासून नोदीं घेणे सुरू झाले आहे.
आज पर्यत जवळपास १७ लोकांची नोदंनी करुन प्राथमिक तपासणी केली. सॅनेटाईझर ने हात धुतले व त्यांना स्वच्छता घेणे बाबत मार्गदर्शन केलं सोबत मास्कचे वाटप केले. याच बरोबर वैधकीय अधिकारी मनोज पाटील यांनी होम क्वारंटाईन चा स्टॅम्प करून घरी बसण्याचा सल्ला दिला असून घरीच गोळ्या औषधे घेवुन घरीचं थांबा इतत्र फिरु नका.
कोरोना व्हायरसाच्या संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेता. सद्या आपल्या खान्देशात लग्नसमारंभाचे दिवस आहेत व त्यासाठी मुंबई, पुण्याकडचे पाहूणे येतील म्हणून खबरदारीचा ऊपाय म्हणून मास्क किंवा रूमालचा वापर करा, हस्तांदोलन टाळा, हात स्वच्छ धुवून जेवण करा, गर्दीकरून किंवा समुहाने थांबू नका. सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास जानवू लागल्यास त्वरित दवाखान्यात जा. गावातील डॉ अमोल मोरे यांनी देखील गावात स्पिरिटचा उपयोगाने रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी करतांना स्वतः व रुग्णांना देखील हात स्वच्छ धुण्याचा सल्ला देतात, सोबत त्यांनी उपाय म्हणून गल्ली बोळात घराबाहेर दिसणाऱ्या नागरिकांना स्पिरिटने हाताला व स्पर्श केला वस्तूला देखील स्पिरिटने स्वछ करतात.
ग्रामपंचायत कुरखळी च्या वतीन गावात लोकामधे जनजागृती करून कोरोना विषाणूबाबत माहिती पत्रक वाटुन तसेच संचारबंदी असल्यामुळे कोणी घराबाहेर पडू नये, चार पेक्षा जास्त लोकानी चौकामधे थांबू नये. ग्रामपंचायत सरपंच सीताराम भिल व त्याचे सर्व सहकारी उपसंरपच ग्रा प सदस्य हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत गावातील कुरखळी ग्रामसर्वांगीन विकास मंच च्या वतीने व गावातील तरुनांचा देखील चागला सहभाग आहे. बाहेरगावाहुन आलेल्या माणसाची लगेच माहिती दिली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रशी सपर्क करुन लगेच त्या माणसाला आरोग्य यंत्रणा घरी जाऊन तपासणी करुन नोंद केली जात आहे.
ग्रामपंचायत कुरखळी यांच्यावतीने गावात लवकरच फवारणी करण्यात येणार असून. अशीच काही दिवस शातंता ठेवत नागरिक घरी बसून राहिले तर कोरोनाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही.
लोकांनी संयम ठेवला तर पोलिस, आरोग्य यत्रंणा ग्रामपंचायतीला सहकार्य होईल व त्यांच्यावरील अतिरिक्त ताण कमी होईल. सुचनाचे पालन केले पाहिजे, तरीही लोकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. असा संदेश प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे गटाचे वैद्यकीय अधिकारी मनोज पाटील यांनी दिला.
याप्रसंगी सरपंच सिताराम भिल, ग्रामसेवक बी एस चव्हाण, ग्रा. पं. सदस्य, अवधूत मोरे, डॉ. मनोज पाटील (वैद्यकीय अधिकारी), एस डी वाडीले(आरोग्य सहाय्यक), एस एस शेख (आरोग्य सेवक), एन बी चौधरी (आरोग्य सेवक), दीपक ईशी, पुरुषोत्तम शिरसाठ, पराग मोरे, पावबा कोळी, सचिन मोरे, आशा कर्मचारी, शिपाई, सुधाकर मोरे, पत्रकार योगेश्वर मोरे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
अमळनेर : चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल ,सहा ज...
-
वासरे ता अमळनेर येथे अतिवृष्टी व ढगफुटीत नुकसान व दैनंदिन जिवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचा...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
“अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक ३ मधील दलित-मागासवर्गीय वस्तीवर अन्यायकारक प्रभाग रचना.. अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद निवडणु...
-
मयत । अमळनेर : मुलाने सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्याचा खून केल्याची घटना ३१ रोजी रात्री साड...
-
.अमळनेर :-प्रतिनीधी तालुक्यातील मारवड मंडळात ता.२९ रोजी १२० मि.मी.पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा