Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ मार्च, २०२०

तरुण गर्जना न्युज ई पेपर परिवाराकडून आवाहन.. महिला भगिनींनी अफवेवर व अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नये.



जळगांव/शेगांव प्रतिनिधी: उत्तर
महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील एरंडोल-कसोदा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात महिला अफवेच्या बळी ठरत असतांना दिसत आहेत.

महिला भगिनी ह्या निंबाच्या झाडाखाली दिवे लावण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. एरंडोल तालुक्यात तसेच शेगांव तालुक्यातील घटनांवरून समोर येत आहे की, एका तृतीयपंथीयाने आपल्या मृत्यू समयीच्या कथित शापाच्या अफवा पसरून एरंडोल-कासोद्यासह शेगांव तालुक्यातील महिला या अफवेला बळी पडत आहेत.

घरात व घराशेजारी असलेल्या निंबाच्या झाडाला ( कणिक ) गव्हाच्या पिठाचे दिवे लावत असून अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. ही सारासार अफवा असून कोणीही घाबरून जाऊ नये व असे कृत्य ही करू नये. एक मुलगा असलेल्या आईने हे करावे असे महिलांमध्ये चर्चिले जात होते.

तृतीयपंथीच्या मृत्यूची अफवा आहे अजून हेही निष्पन्न झाले नाही की, तृतीयपंथी मेलेला आहे की नाही. या अफवेस बळी पडू नका.

असेच एक उदाहरण भोई समाजामध्ये सुध्दा काही समाजकंटकानी पसरविण्याचा पर्यत केला आहे. तरी या अंधश्रद्धेला कोणीही बळी नका पडू असे आवाहन तरुण गर्जना न्युज ई पेपर परिवाराकडून करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध