Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

बुलडाणा जिल्हाधिकारी यांना तरूण गर्जना न्युज ई पेपर चा सलाम!


बुलडाणा:प्रतिनिधी:संपूर्ण देशात कोरोना या आजाराने थैमान घातला आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्याच्या कलेक्टर सुमन चंद्रा मॅडम कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना संपूर्ण जिल्ह्यात करत आहेत.

जिल्ह्यात सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरुपमा डांगे यांनी मिळवला होता. त्यांच्यानंतर श्रीमती सुमन चंद्रा मॅडम यांनी 11 डिसेंबर 2019 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी अनेक अशे प्रशंसनीय उपक्रम देखील राबवले व त्यांनी आपली कर्तव्यदक्षता आपल्या कार्यातून दाखवून दिली. कोरोना च्या या संकटात ज्या पद्धतीने त्या जलद गतीने निर्णय घेत आहेत व संपूर्ण बुलडाणा जिल्हा सांभाळत आहेत ही बाब प्रशंसनीय आहे. 

सुमन चंद्रा मॅडम कॅबिन मध्ये न बसता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सर्व स्थितीवर लक्ष ठेवत आहेत. पेट्रोल पंप बंदची अफवा उठल्यावर रात्री 9 वाजले असतांना ही त्या थेट पेट्रोल पंपावर पोहोचल्या होत्या. 

कोरोनाच्या या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्या लोकांना दिलासा देण्याचे काम अविरतपणे करतच आहे, मात्र एवढ्या कठीण आणि व्यस्त वेळेत ही आज त्यांनी रक्तदान केले. 

त्यांच्या या धाडसाला, कर्तव्यदक्षतेला तरुण गर्जणा ई पेपर चा सलाम…!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध