Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

खिर्डी येथे अमेरिकेतून आलेल्या नागरीकाची आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी.


खिर्डी ता रावेर तालुक्यातील खिर्डी येथे दि 21 रोजी अमेरिकेतून गावात परतलेले मनीष विनोद महाजन (वय 20) यांची प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या अधिकाऱ्यानं कडून पाहणी करण्यात आली.त्याला मुंबई विमानतळावरून त्याची कोरोना तपासणी केल्यानंतर सोडण्यात आले असता तो गावात परातल्यामुळे त्याला घरात एका स्वतंत्र रूम मध्ये आयसोलेटेड करण्यात आले.

त्याची निंभोरा येथील आरोग्य केंद्र चे वैधकीय अधिकारी चंदन पाटील, आरोग्य सहायक रवींद्र जाधव,चंदन पाटील तसेच गावातील पोलीस पाटील प्रदीप पाटील यांनी त्याचे घरात भेट देऊन पाहणी करण्यात आली.तसेच बाहेरुन येणार्यांनी स्वत:हून तपासणीसाठी रुग्णालयात जावून तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याची दक्षता म्हणून, आरोग्य विभागाचे कर्मचारी गावागावांत बाहेरुन येणार्यांचा शोध घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध