Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
नाशिक शहर व परिसरात संभाव्य कोरोना आजाराच्या धोका निर्माण होऊ नये यादृष्टीने सर्वांनी दक्षता घ्यावी.
नाशिक शहर व परिसरात संभाव्य कोरोना आजाराच्या धोका निर्माण होऊ नये यादृष्टीने सर्वांनी दक्षता घ्यावी.
वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील त्यांच्या कार्यालयात आरोग्य, वैद्यकीय विभागाचे अधिकारी तसेच सर्व विभागीय अधिकारी,सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता निरीक्षक यांची एक बैठक आयोजित केली होती.या बैठकीत शहरातील घंटागाड्या, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता,ठीक-ठिकाणी दिसणारे ब्लॅक स्पॉट, उघड्यावर होणारी मास विक्री,रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करणे आदी सर्व विषयांवर चर्चा केली. शहरात स्वच्छता राहील या दृष्टीने काम करण्याचे निर्देश या बैठकीत दिले.
तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्णय यावेळी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.शहरात नियमित व जास्तीत जास्त स्वच्छता राहील याबाबत दक्षता देण्याच्या सूचना दिल्या असून बुधवार दिनांक ११ मार्चपासून संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले
आहेत.
तसेच नागरिकांनी संभाव्य करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना व जनजागृती करण्याच्या सूचना वैद्यकीय व आरोग्य विभागाला यावेळी दिल्या या बैठकीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र त्रंबके,डॉ नितीन रावते,डॉ.प्रशांत शेटे,सहाय्यक आयुक्त जयश्री सोनवणे,सहाय्यक आरोग्य अधिकारी सचिन हिरे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे,पूर्व विभागीय अधिकारी मुदलवाडकर, सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता निरीक्षक या बैठकीस उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा