Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी चे काम वेगाने सुरु, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फवारणी मिशन जोरात
शिरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत निर्जंतुकीकरणासाठी फवारणी चे काम वेगाने सुरु, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फवारणी मिशन जोरात
शिरपूर:प्रतिनिधी:शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्यावतीने नियमितपणे कोरोनाबाबत जनजागृती व प्रतिबंधित अंमलबजावणी म्हणून शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या ताफ्यात शहरात फवारणीसाठी अनेक वाहने कार्यरत असून आरोग्य विभाग हा अतिशय जबाबदारीने आपले काम पार पाडत आहे.
सकाळी खूप लवकर सर्वच्या सर्व फवारणीची सहा वाहने, त्यांच्यावरील ड्रायव्हर, कर्मचारी, आरोग्य पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी हे शहरातील प्रत्येक भागात फवारणीच्या कामासाठी पुढे आले आहेत. रात्री उशिरापर्यंत फवारणीचे काम अतिशय प्रामाणिकपणे हे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी पार पाडत आहेत.
कोरोना सारख्या हाहाकार माजविणाऱ्या अडचणीच्या परिस्थितीत देखील एकजुटीने आरोग्य पथकातील सर्वजण हातात हात घालून शिरपूर करांच्या आरोग्यसेवेसाठी झटत आहेत. आरोग्य पथकाला शिरपूरकर धन्यवाद देताना दिसून येत आहेत.
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना ने सर्वत्र भीती देखील मोठ्या प्रमाणात पसरली आहे. परंतु आपण सर्वांनी जास्तीत जास्त वेळ घरातच घातल्यावर मात्र कोरोनाला अटकाव होईल हा सकारात्मक विचार सर्वांनी अंगिकारणे गरजेचे आहे.
प्रशासन व पोलिस यंत्रणा अतिशय जबाबदारीने अहोरात्र राबत आहेत. तालुका व शहरी आरोग्य विभाग देखील डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून फवारणीचे काम खूपच मनापासून केले जात आहे.
शिरपूर शहरात अनेक ठिकाणी युवावर्ग विनाकारण बऱ्याचदा अति उत्साहात पुन्हा पुन्हा घराबाहेर पडत असल्याची बाब चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात अविचारी व बेजबाबदार पणा याला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस आल्यावर धावत पळत लपतात व पोलिस गेल्यावर पुन्हा घराबाहेर पडतात हे चूकीचे दृश्य अनेक ठिकाणी दिसून येत आहे. पालकांनी जबाबदारीने आपल्या मुलांना घरात ठेवणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्गा पासून शिरपूर शहराचे संरक्षण करण्यासाठी शिरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने निर्जंतुकीकरणासाठी फवारणी चे काम सुरू केलेले आहे.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल, शिरपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने शहरात फवारणीचे काम वेगाने सुरू केले आहे.
या फवारणी पथकामध्ये अत्याधुनिक ब्लोअर मशीन चा प्रभावी वापर करण्यात येत आहे. तसेच प्रत्येकी ६०० ली. क्षमतेचे ३ ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रे मशीन, ४ मॅन्युअल स्प्रे मशीन, ४ फॉगिंग मशीन यांचा समावेश आहे. शहराची व्याप्ती आणि कोरोना संसर्गाची भीती यामुळे शिरपूर नगरपरिषदेने नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे आदेशाने सहाशे लिटर क्षमतेचे ब्लोअर मशीन खरेदी केले असून त्यामुळे पथकाची शहरातील फवारणी करण्याची क्षमता वाढली.
दि. २७ मार्च २०२० रोजी शिरपूर नगरपरिषदेने अजून एका ब्लोअर मशीन ची खरेदी केली. हे ब्लोअर मशीन उच्च क्षमतेचे असून या मशिनद्वारे सुमारे ४० फुटाच्या परिसरापर्यंत फवारणी करता येते.
सद्यस्थितीत नगरपरिषद जंतुनाशक फवारणी करता आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १ टक्के सोडीयम
हायपोक्लोराइड द्रावणाचा वापर करत आहे. आजमितीस स्वच्छता विभागाकडे या द्रावणाचा पुरेसा साठा नगरपरिषदेने करून घेतला आहे. त्यामुळे भविष्यकाळात देखील उत्तम क्षमतेने स्वच्छता विभाग काम करू शकेल. सद्यस्थितीत नगरपरिषदेची फवारणी यंत्रणा संपूर्ण शहराची फवारणी दोन-तीन दिवसात करू शकेल इतपत सक्षम करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शिरपूर नगर परिषद कटिबद्ध आहे.
या सर्व कामांवर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक हे लक्ष ठेवून आहेत. त्यांचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन प्रशासनास लाभत आहे.
नगरपरिषद स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षित ठेवण्या करता धडपडत आहेत. आता नागरिकांनीदेखील आपले स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. लाॅकडाऊनच्या काळात आपल्या घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
सफाई कामगारांचे मोठ्या प्रमाणात योगदानखूपच अभिमानाची बाब असून सर्व जनतेने त्यांच्या अविरत कार्याची दखल घेवून त्यांना सलाम केला पाहिजे.
कोरोनाबाबत उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल माने, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, तालुक्याचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा कोरोना बाबत जनजागृती मोहीम तसेच गावबंदी करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा