Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

धुळे महानगरपालिकेने किराणा दुकान, औषधे दुकान, भाजीपाला, फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना विक्री साठी केले वेळेचे नियोजन


धुळे:प्रतिनिधी:सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झाली आहे. सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आलेल्या असून. 

त्यादृष्टीने राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (COVID-१९) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा. १८९७ दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागू करुन 

लॉकडाऊन कालावधीमध्ये फळे व भाजीपाला विक्री आणि किराणा व औषधाचे दुकाने येथील नियमनासाठी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले असून.

फळे व भाजीपाला विक्रेते यांचे नियोजन 

१) बंदिस्त भाजी मार्केट बंद करून तेथील दुकानदार किंवा गाळे धारकाना बाहेर किमान १०० फुट अंतरावर बसण्याची निर्देश द्यावेत, जास्त दुकाने व कमी जागा अशी परिस्थिती असल्यास हे अंतर किमान ५० फुटापर्यंत कमी करावे.

२) अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भाजीपाला व फळांचे विक्रेत बसतात. त्यांच्यासाठी रस्त्यावर जागा निश्चित करून 
त्यांच्यातील किमान अंतर १०० फूट टेवण्यात यावे. अपवादात्मक परिस्थितीत ते ५० फूटापर्यंत कमी करता येईल.

३) मोठ्या व गर्दी होत असलेल्या भाजी दुकानांच्या समोर सदरच्या दुकानदारांनी प्रत्येक ग्राहक किमान 3 फुटाच्या अंतरावर उभे राहील अशा पद्धतीने रस्त्यावर मार्किग करण्यात यावी.

४) फिरती हातगाडी वापरून भाजीपाला विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यास केवळ एक फिरती हातगाडी ठराविक भागात भाजी विक्रिसाठी अनुमती राहील.

५) प्रत्येक भाजी विक्रेत्यांने स्वच्छ हातरुमाल/ मास्क वापरण्यात यावा

६) आपल्याकडे विक्रीसाठी असलेला भाजीपाला स्वच्छ राहील यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी.

(ब) किराणा, औषधे व तत्सम अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने यांनी करावयाचे नियोजन 
१) दुकानदारांनी फोनवर किंवा मोबाईलवर खरेदीसाठीच्या ऑर्डर स्वीकारण्याची व्यवस्था करावी.

२) या सर्व दुकानदारांनी व व्यवसायिकांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागावर दूरध्वनी क्रमांक व व्हाट्स अप क्रमांक ठळक जागी लावावे.

३) मोठ्या गर्दी होत असलेल्या दुकानांच्या समोर सदरच्या दुकानदारांनी प्रत्येक ग्राहक किमान ३ फुटाच्या अंतरावर उभे राहील अशा पद्धतीने रस्त्यावर मार्किग करावे.

४) दुकानांमध्ये आलेला ग्राहक यांचेमध्ये सुद्धा पाच फुटांपेक्षा जास्त अंतर राहील यासाठी खबरदारी घेण्यात यावी.

५) दुकानदाराने व त्याच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ हात रुमाल वापरावे. व वेळोवेळी साबन व स्वच्छ पाण्याने हात धुवावे.

६) ज्या दुकानांमध्ये जास्त गर्दी होते अशा दुकानांनी दुकानाबाहेर गर्दी नियंत्रणासाठी स्वतःचे पुरेसे कर्मचारी नियुक्त करावे.

(क) जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा संकलित करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीने घ्यावयाची खबरदारी 

१) कोणतीही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील केवळ एका व्यक्तीने घराबाहेर पडावे.

२) सदरच्या व्यक्तीने मास्क वापरावा किंवा नाक व तोंड पूर्णपणे स्वच्छ रुमालाने झाकून मगच घराबाहेर पडावे.

३) जीवनावश्यक वस्तू जसे की भाजीपाला फळे इत्यादी घरामध्ये गेल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचा वापर करावा.

४) शिजवून खावयाचे अन्न पूर्णपणे शिजवून त्याचे सेवन करावे.

५) राज्यात संचारबंदी लागू असून जीवनावश्यक वस्तू खरेदी खेरीज अन्य कारणासाठी आपत्ती व्यवस्थापन किंवा अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त इतरांनी फिरू नये. तसे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल,

वरील प्रमाणे नियोजनानुसार किराणा औषधे व जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना 
विक्रीची वेळ सकाळी ८.०० ते ११.०० व सायंकाळी ०५.०० ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत राहिल.

सर्व जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे विक्रेते यांनी सदर वेळेत दुकाने उघडी ठेवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सदर विक्री करतांना दोन ग्राहकांमधील सामाईक अंतराचे पालन करण्यात यावे वरील नमुद आदेशाचे उल्लंघन केल्यास व्यक्ती / संस्था ही भारतीय दंड संहिता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २०२० मार्च १४ अन्वयेच्या अधिसूचना व नियमावली (एम) वड (सी) मधील पोट कलम (ग) ३४ कलम २००५ च्या तरतुदीच्या शिक्षेस पात्र असे आवाहन धुळे महानगरपालिका धुळे 
आयुक्त अजिज शेख यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध