Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरंभ सामाजिक संस्था आरोग्य विभागाच्या मदतीला


आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नळदुर्ग शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध कर्मचारी यांची संख्या बाबत चौकशी केली होती, या महामारीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवकांची आवश्यकता भासल्यास संस्थेला कळवावे असे आवाहन केले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकांमध्ये भीती आहे, सकाळी 9.30 ते 1 ओपीडी च्या वेळेत 100-200 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामध्ये बाहेरून आलेले संख्या मोठी आहे. 

नळदुर्ग परिसरात कोरोनाचा रुग्ण किंवा संशयित अद्याप नाही पण एखाद्याला लक्षणे आढळल्यास तो आरोग्य केंद्रात नक्कीच येईल तेव्हा या गर्दीत तो जर मिसळला गेला तर संक्रमण होण्याची भीती आहे,  यासाठी येथे विविध आजाराने येणाऱ्या रुग्णांमध्ये किमान 1 मिटर अंतर ठेवून चौकोन तयार केलेल्या ठिकाणी रुग्नाना उभे करणे केस पेपर, गोळ्या घेणे, तपासणी साठी 

वेगवेगळ्या रांगा करणे तसेच 1मीटर अंतरावर रूग्णांना उभे करण्यासाठी चौकोन चिन्हांकित करणे, रुग्णांना केस पेपर काढण्यास मदत करणे, कोरोनाबाबत जनजागृती करणे अशा विविध पद्धतीने संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रशासनाला मदत केली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. भोसले, डॉ. आनंद काटकर, गणेश बडुरे श्री पि आर कुलकर्णी, श्रीमती फंड सिस्टर, श्री पवार, पत्रकार सुनील बनसोडे यांच्या मदतीला आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष राहुल हजारे उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध