Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
संस्थेच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांची आठवण कायम राहील - आमदार अनिल पाटील
संस्थेच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांची आठवण कायम राहील - आमदार अनिल पाटील
प्रतिनिधी अमळनेर संस्थेच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांची आठवण कायम राहील आमदार अनिल पाटील यांनी येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव मुख्य शाखा अमळनेरच्या रौप्य महोत्सव कार्यक्रम, इमारत उद्घाटन, कोनशीला अनावरण प्रसंगी केले.
प्रास्ताविकात जे एस पाटील यांनी संस्थेच्या परिचय देतांना सांगितले की शांताराम शामराव पाटील यांनी पतपेढी सुरू केली. त्याचे आज सुसज्ज मालकीची इमारत झाली असून सभासद संख्या 805 आहे. 9 टक्के दराने व्याजदराने सभासदांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. तसेच सुकन्या योजनेत सभासदांच्या मुलीच्या लग्नात 5 हजार रु मदत देते. तर मयत सभासदाला 40 हजार रुपये तातडीने देते. संस्था यापुढे चांगल्या सुविधा देण्यासाठी कार्य करेल.
असे सांगितले व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष शांताराम शामराव पाटील, विठ्ठलराव देसाई, जळगाव जिल्हा पतसंस्था माजी अध्यक्ष संभाजी पाटील, आर बी पवार, जळगाव माध्यमिक अध्यक्ष शालिग्राम भिरुड, मारवड हायस्कूल चेअरमन जयवंतराव पाटील, संदीप घोरपडे, ग स संचालक शामकांत भदाणे, संचालिका विद्या कदम, शिक्षक संघटनेचे रावसाहेब पाटील, शिक्षक भारती नारायण वाघ, मनोहर सूर्यवंशी, धनगर पाटील, डी सी पाटील, पी बी पाटील, सुशील भदाणे, तज्ञ संचालक माध्यमिक पतपेढी, आर डी चौधरी, सुधाकर देशमुख, एम ए पाटील, आर जे पाटील, आर डी बोरसे माजी व्यवस्थापक लोकनाथ पाटील यांचाही गौरव यावेळी करण्यात आले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सुलोचना पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव आर बी पाटील, खजिनदार कविता पाटील, जे एस पाटील, सचिन साळुंखे, आर बी पवार, एच ए विसावे, तुषार बोरसे, के यु बागुल, रमेश चव्हाण आदींनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी दिले
25 वर्ष झाल्याने सभासदांना भेट म्हणून ब्लॅंकेट वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेची वाटचाल सांगताना शांताराम पाटील यांनी सांगितले कि, सांगतांना अतिशय आनंद वाटतोय छोट्या वेलीचावटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्था स्थापन झाली तेव्हा 6 महिन्यात कर्जरूपाने 2 हजार रुपये वाटप केले अडचणीत असलेल्या माध्यमिक शिक्षकाला दिलासा मिळाला त्यावेळी लाभला.
आज इमारत उभी झाली याचा आनंद झाला. कर्ज घेतले तर फेड करावी. लोक कर्ज सूट कधी होईल याची वाट पाहतात. हे संस्थेच्या हितावह नाही. असे सांगत शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना आमदार अनिल पाटील म्हणाले कि माझ्या विजयात या सर्व शिक्षक, कर्मचारी, नोकरदार, वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. याचे कौतुक वाटते कि रोपट्याचा वटवृक्ष झाला. अत्यंत अवघड कार्य करत कमी व्याजदरात कर्ज देते आणि संस्था जिवंत राहते.
यासाठी परतफेड करणाऱ्या सभासदांची मोठी महत्वाची भूमिका असते. संस्थेच्या वाटचालीत अनेकांचे हातभार असतात. पदाधिकारी डबघाईला नेणारा नसावा. पदाधिकाऱ्यांच्या कामाने संस्थेची दिशा ठरते. वाईट गुण असले तर त्या दृष्टीने संस्थेकडे पाहिले जाते. याची पूर्णपणे खात्री सभासदाला असते म्हणून आपली ती संस्थेच्या हिताची जबाबदारी येते. जागा घेणे आणि बांधकामासाठी वास्तू तयार करण्यासाठी निधी उभा करण्याचा प्रयत्न असतो. दुःखात सामाजिक पद्धतीने संकटाचा कुटुंबात जटिल प्रश्न उभा असतो. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळत असेल तर सभासदांचे ऋण फेडण्याचे काम ही संस्था करत असते. त्याचे कौतुक करावे तितके कमी.
सभासदांच्या हितासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असेल तर कदर केली पाहिजे. अध्यक्ष पदावर आणि इतर पदांवर महिला जबाबदारी सांभाळत आहेत. त्या महिलांवर संस्थेची प्रगती करण्याची जबाबदारी आली आहे. या वास्तूसाठी ज्याने कष्ट केले असेल येणाऱ्या दिवसात जिवंत असेपर्यंत त्यांची आठवण येईल.सर्वजण ही वास्तू सांभाळणार याची मला खात्री आहे.असे आमदार पाटील म्हणाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा