Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यु; अहवालाची प्रतिक्षा



कोरानाचा रुग्ण आला अन् हॉस्पिटलमधील पेशंटसह  कर्मचारी पळाले !

जळगाव:प्रतिनिधी: कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे . या रुग्णाचा मृत्यू नेमका कोरोणाने झाला की इतर आजारांमुळे याबाबतचे नेमके कारण तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे .

सदरचा रुग्ण चोपडा तालुक्यातील होता. तो अतिदक्षता विभागात दाखल होता. त्याला मधुमेह होता . कोरुना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने त्याचे ही नमूने घेतले होते. मात्र तपासण्या वाळण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याला जिल्हा रुग्णालयाकडून दुजोरा मिळालेला आहे . 

मात्र नेमका त्याचा मृत्यू कशाने झाला हे तपासण्यावर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे . दरम्यान मंगळवारी उशिरापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह प रुग्णाच्या संपर्कातील दाखल २० रुग्णांचे हे तपासणी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध