Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

Oxfo national pre schoolचा तिसरा वार्षिक स्नेह संमेलन नुकताच साजरा करण्यात आला.



अहमदपूर प्रतिनिधी गजानन आनंतवाळ    Oxfo national pre schoolचा तिसरा वार्षिक स्नेह संमेलन नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब पटेल जागीरदार सर होते तर प्रमुख पाहुणे डॉ.प्रा. आर. एम. कदम सर(म. गांधी महाविद्यालय) , केंद्र प्रमुख एन.ढाकणे सर, तसेच प्रसिद्ध लेखक,साहित्यिक श्री. मोहिब कादरी सर उपस्थित होते. 

मनोगत व्यक्त करताना प्रा. कदम सरांनी तंत्रज्ञानाच्या युगात पालक आणि विध्यार्थी यांच्यातील संबंध आणि जबाबदाऱ्या या विषयावर सुंदर असे मत व्यक्त केले तर जेष्ठ साहित्यीक कादरी सरांनी बदलत्या समाजाचे स्वरूप या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन केले.

 शाळेच्या लहान लहान चिमुकल्यानी अतिशय सुंदर अभिनय, नृत्य सादर करत त्या माध्यमातून समाजात अनेक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेख सबा मॅडम आणि शेख आफ्रिन मॅडम यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक इकबाल पटेल सर यांनी मानले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध