Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
सत्रासेन वनक्षेत्रात बहुगुणी केशरी रंगाचा पळस फुलला.......
सत्रासेन प्रतिनिधी:'फ्लेम ऑफ द फॉरेस्ट' असे खुद्द इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले आहे. असा तो पळसवृक्ष सत्रासेन वनक्षेत्रा मध्ये चोहीकडे केशरी रंगाच्या फुलांनी बहरला आहे. पळसाची केसरी फुले जाणाऱ्या आणि येणार्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती असून वसंत ऋतूची चाहूल लागताच गर्द केशरी रंगाने फुलोरा पांघरून नटलेला पळस वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.
सध्या पळसाच्या प्रत्येक फांदीवर लागलेल्या लाल रंगाच्या फुलांमध्ये संपूर्ण झाडच फुलांनी बहरलेले दिसून येत आहे. पळसाला तळहाता एवढी रुंद पाने असतात. पूर्वी त्या पानापासून पञावळी, द्रोण बनवल्या जात असत आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झाले नाही. खानदेश मध्ये सर्वपित्री अमावस्या च्या वेळी पत्थर वाडी च्या वापर केला जातो किंवा एखाद्या कार्यक्रमात मध्ये प्रसाद वाटण्यासाठी त्याच्या वापर केला जातो.
पूर्वी पळसाच्या फुलापासून रंग तयार करून धुलिवंदनाच्या दिवशी त्याचा वापर होत असे, मात्र कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा