Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

एस.व्ही.के.एम.चे एन.एम.आय.एम.एस. स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मुंबई मार्फत कोविड -19 संकटाचा सामना करताना व्यवसायाकडून समाजाला असलेल्या अपेक्षांवरील अध्ययन संपन्न



मुंबई:प्रतिनिधी:द जासानी सेंटर ऑफ सोशल एंटरप्रेन्योरशिप अँड सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट अँड द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फोरम ऑफ स्टुडंट्स, एस.व्ही.के.एम.चे एन.एम.आय.एम.एस. स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मुंबईने, कोविड-19 संकटाचा सामना करताना व्यवसायाकडून समाजाला असलेल्या अपेक्षांवर एका अध्ययनाचे आयोजन केले होते.

आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या कार्याचा एक भाग म्हणून, कोविड-19 संकटाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी व्यवसाय काय करू शकतात यावर लोकांची मते जाणून घेणे हे संपूर्ण भारतभर आयोजित करण्यात आलेल्या या अध्ययनाचे प्रमुख उद्दिष्ट होते.

यातील प्रमुख निष्कर्ष -

1. कोविड-19 च्या संकटामुळे अनेक गट प्रभावीत झाले आहेत, परंतु 70 टक्के अध्ययनकर्त्यांना वाटले की दैनंदिन वेतन मिळविणारा आणि एकटे राहणारा वृद्ध लोकांचा गट सर्वाधिक प्रभावीत झाला आहे. जरी काही राज्यांनी पीडीएसद्वारे रोख हस्तांतरण आणि अन्न पुरवठा यासारख्या उपाययोजना जाहीर केल्या असल्या, तरी संपूर्ण भारतातील वास्तविक स्थिती पाहिल्यास ध्यानात येते की लाखो आंतरराज्यीय स्थलांतरित कामगारांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे आणि अजून बरेच काही करण्याची आवश्यकता आहे.

2. कोविड-19 चा शाश्वत विकास लक्ष्य (एसडीजी) प्राप्त करण्यावर “मूर्त प्रभाव” पडलेला आहे. यामुळे एसडीजी अंमलबजावणीचे प्रयत्न जटिल बनले आहेत आणि आरोग्य, अन्न सुरक्षा व उत्तम कार्यावर एसडीजी लक्ष्य प्राप्त करण्यात जोखीमचे संकेत मिळत आहेत. 75 टक्के अध्ययनकर्त्यांनी असे म्हटले आहे की गरीब, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना सातत्याने अन्नपुरवठा करण्यासाठी आणि कोविड-19 ने बाधित रूग्णांना उपचार प्रदान करण्यासाठी त्वरित आधार म्हणून व्यवसाय आपली नाजूक आरोग्य सुविधा मजबूत करू शकतात.   

3. 80 टक्के अध्ययनकर्त्यांच्या अनुसार आरोग्य सेवा क्षेत्र व्यवसायाला बळकटी देण्यासाठी दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमधील वैद्यकीय सेवा, सामाजिक स्वच्छता यांची उपलब्धता सुधारण्यासाठी सीएसआर गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याशिवाय, सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे गरिबांसाठी वैद्यकीय संशोधन आणि रोजगाराच्या संधींमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

4. या सर्वेक्षणात अध्ययनकर्त्यांनी वाढविलेल्या शिफारशींद्वारे स्पष्ट होते की आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक टिकाव सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला आर्थिक धोरणे, वित्तीय प्रोत्साहन, आरोग्य सेवा आणि सामाजिक संरक्षणाच्या गुंतवणूकीचे योग्य मिश्रण करणे आवश्यक आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध