Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
लॉकडाऊन मध्ये अवैध दारू साठ्यावर पोलिसांची कारवाई
नांदुरा:प्रतिनिधी नांदुरा येथील एका लायसन्स धारक देशी व विदेशी दारूच्या दुकानामध्ये अवैध दारू साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून २ एप्रिल रोजी या दुकानावर पथकाने धाड टाकून दहा लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाई वर्ग केली मात्र या विभागाने सदर दारूचा साठा अवैध नसल्याचा खुलासा केल्याने या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राजेश मियाणी यांच्या बियर शॉप, देशी दारू, वाईन शॉप या प्रतिष्ठानावर १ एप्रिल ला रात्री मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांनी कारवाई करत दुकानाला सिल ठोकले होते. या दुकानात अनधिकृत साठा असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. देशी दारु दुकानाच्या बाजुला असलेल्या रुम मध्ये टॅंगो देशी दारू १८० एम.एल चे २५४ बाॅक्स, टॅंगो ९० एम.एल.चे १७३ बाॅक्स एकुण ४१४ बाॅक्स किंमत ९ लाख ९३ हजार सहाशे रुपये सापडला. रात्री नऊ वाजता दुकानाला सिल ठोकून, दुकानातील माल व प्रकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. २ एप्रिल रोजी सकाळी दुकानाचे सिल उघडून, प्रतिष्ठानातील माल हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
तसेच या दुकानातील साठा अधिकृत,वैध किंवा अवैध तसेच निर्धारीत क्षमतेपेक्षा जास्त आहे का ? याबाबत कारवाई करून अहवाल देण्यात यावा,अशी लेखी सुचना मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्याने ०२ एप्रिल रोजी बुलडाणा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दिपक शेवाळे , मलकापूर राज्यउत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एस.जी.गायकर,ब.रा.बर्डे व त्यांचे पथक संबंधित प्रतिष्ठानात दाखल झाले मात्र दारूचा साठा अवैध नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा