Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

मरकज कार्यक्रमाचा बुलडाण्यालाही दणका,नवीन 3 पॉझिटिव्ह दिल्ली रिटर्न



बुलढाणा प्रतिनिधी 5 एप्रिल : दिल्ली निजामोद्दीनमध्ये झालेल्या मरकज कार्यक्रमाचा संपूर्ण देशाला फटका बसला आहे… बुलडाण्यालाही हा कार्यक्रम महागात पडणार असल्याचे दिसत असून आज सकाळी प्राप्त झालेले तीन रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असून तिन्ही रुग्ण दिल्लीवरून परत आला असल्याची माहिती पक्की माहिती  मिळाली आहे. 

जिल्ह्यात आता एकूण 8 कोरोना बाधित झाले असून त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. महत्वाची बाब म्हणजे या तीन पैकी एकही बुलडाणा शहरातील रहिवासी नाही… मरकज कार्यक्रदरम्यान दिल्ली येथे गेलेल्या 17 जणांचा जिल्हा पोलीस प्रशासनाने शोध घेतला होता. 

त्यातील 16 जणांचे स्वाब तपासणीसाठी युद्धस्तरावर नागपूरला पाठविण्यात आले. एक जण 14 दिवसांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेला होता त्यामुळे 16 जणांचेच पाठविले. काल सकाळी सुरुवातीला 10 जणांचे रिपोर्ट मिळालेत. ते निगेटिव्ह आलेत. नंतर आणखी 2 जणांचे निगेटिव्ह मिळाले. उर्वरित चार जणांपैकी 3 मात्र पॉझिटिव्ह आलेत तर एकूण निगेटिव्ह 13 आहेत. हे तीनही कोरोना बाधित बुलडाणा शहरातील नाहीत. 

एक घाटाखालील तर दोन घाटावरच्या भागातील आहेत. आता कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 झाली आहे. शहराची चिंता वाढविणारी ही बाब असून स्वतःला वाचवायचे असेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

जे तीन पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्या संपर्कातील इतरांना ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता बळावली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध