Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

भाजपाच्या स्थापना दीना निमित्ताने कोरोना च्या लढाईसाठी मतदारसंघातील जनतेची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला आ संजय कुटे कडून 5 लक्ष इतकी आर्थिक मदत



तीन महिन्याचे वेतन व भत्ते सहित होणारी रक्कम 5.10 लक्ष उपविभागीय अधिकारी यांचे कडे वर्ग
कोरोना  या गंभीर आजराने आज महामारीचे रूप धारण केले असून संपूर्ण जगभरात 13 लखापेक्षा जास्त रुग्ण आहेत तर 70 हजारांपेक्षा जास्त लोक  यात मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात सुद्धा याचा प्रसार आजच्या परिस्थितीत दर रोज वाढताना दिसत असून 100 च्या वर मृत्यू झाले आहेत तर 4000 च्या घरात रुग्ण उपचार घेत आहेत. 

अश्यावेळी मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि कोरोनाच्या विरुद्ध सुरू असलेल्या  युद्धात थेट लढत असलेल्या कर्मचारी वर्गा करिता सगळी संसाधन उपलब्ध करून देणे हे माझे आद्य कर्तव्य मी समजतो. प्रशासनाला शासन नियमानुसार ही सर्व संसाधन मिळत असतात पण अनेक वेळा  ती योग्य वेळी मिळत नाही किंवा अपुरी मिळतात असे लक्षात येते आणि नंतर परिस्थिती हाताळण्यात उशीर होतो. 

देशभरातून केंद्र आणि राज्य सरकार ला विविध संस्था, उद्योजक, सेलिब्रिटी, राजकीय मंडळी, सर्वसामान्य  नागरिक यांचा मदतीचा ओघ सुरूच आहे. मला सुद्धा तशी मदत करता आली असती पण अश्या संकट समयी माझ्या मतदारसंघातील जनतेला उत्तम प्रकारे मदत मिळावी आणि ती त्याच क्षणाला मिळावी तसेच मतदारसंघात कार्यरत अधीकारी व कर्मचारी यांची सुरक्षा लक्षात ठेवून त्यांचे देखील मनोबल यामुळे उंचावेल  एवढ्याच उद्देशाने मी माझ्या पुढील एप्रिल, मे, जून या 3 महिन्याच्या 5.10 लक्ष इतका वेतन व भत्ते सहित असलेला पगार हा मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी आणि जळगाव जामोद , संग्रामपूर आणि शेगाव येथील तहसीलदार यांच्या कडे देणार आहे. 

पैकी 3.40लक्ष इतका निधी त्यांनी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुकायसाठी उपयोगी आणावा तर उर्वरीत 1.70लक्ष इतका निधी हा शेगाव तालुक्या साठी शेगाव तहसीलदार यांनी उपयोगी आणावा. त्याच बरोबर उन्हाचे दिवस असल्याने आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फील्ड वर काम करताना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे जळगाव, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील आरोग्य, पोलीस, महसूल, नगरविकास आणि ग्रामविकास  या विभागातील कर्मचारी बांधवान करिता छोटेशे सहकार्य म्हणून RichAqua कंपनी च्या या 1 लिटर पॅक पाण्याचा 25 हजार बॉटल सुध्दा देण्यात येतील. तसेच मतदारसंघातील सगळी गावे साधारणतः 2 वेळ पर्यंत सॅनिटाईझ करण्यात आलेली आहे याचा तिसरा टप्पा हा 10 ते 14 एप्रिल च्या दरम्यान कृतीत आणायचा आहे त्याकरिता सोडियम हायपोक्लोराईड या औषधाने प्रत्येक गावात फवारणी करणे आहे त्याकरिता लागणारे औषध हे प्रत्येक ग्रामसेवकांना माझ्या तर्फे मोफत पुरविण्यात येईल.

   
यामध्ये आरोग्य विभागाला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटाईझर, ऑक्सिजन, आवश्यक औषधी, प्रोटेकशन किट, अँप्रोन, डेटॉल, फिनाईल आदी वस्तू गरजे नुसार घेता याव्यात. प्रत्यक्ष फील्ड वर काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वस्तू मिळणे महत्वाचे असल्याने त्याचा पुरवठा त्यांना करणे आवश्यक आहे. तसेच येणाऱ्या काळात केंद्र शासनाकडून प्रत्येक महिला व शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत  प्राप्त करून घेण्यासाठी बँकेसमोर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तीथे सोशल डिस्टनसिंग पाळता यावे याकरिता सावली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकरिता तीथे एक कापडी पेंडाल टाकावा जेणेकरून सावली आणि सोशल डिस्टनसिंग ह्या दोन्ही गोष्टी साध्य करता येतील. 

बंदोबस्त च्या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस बांधव शहरात येत असतात त्यांना जेवणाची व्यवस्था करणे, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी हे सुद्धा प्रत्यक्ष फिल्ड वर काम करत आहेत त्यांना आरोग्य साहित्य देणे आवश्यक आहे. यासह अनेकवेळ  प्रशासनाला काही  विषय जे वेळेवर येतात ते सोडवताना शासकीय नियमांच्या अडचणी येतात ते सर्व विषय अडचणी सोडवण्यासाठी ह्या निधीचा उपयोग संबंधित अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत करून घ्यावा करावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध