Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

शिरपूर शहरातील नागरिकांना खुशखबर.. आपल्या शहरात घरपाेच भाजीपाला बास्केट विक्रीची सेवा...



शिरपूर प्रतिनिधी ना बाजारात जायचे काम..ना द्यावा लागणार जादा दाम.. "शिरपुर फ्रेश" कडे द्या आता हे काम! या संकल्पनेवर आधारित शिरपूर तालुक्यातील युवक रितेश राजपूत, पिंप्री यांनी
आपल्या शिरपुरकर जनतेच्या सेवेसाठी उत्तम गुणवत्ता असलेला भाजीपाला, ताेही याेग्य दरात बास्केट द्वारे घरपोच सेवा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे यात दि.06 एप्रिल, साेमवार पासुन शहरात ही सेवा देण्याचे काम सूरू झाले आहे. 

तरी आपणही  या संधीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रितेश राजपूत यांनी केले आहे.आपला अमुल्य वेळ, पेट्रोल, पैसा तर वाचेल मात्र ताजा, गुणवत्तापूर्ण व विषमुक्त भाजीपाला घरपाेच मिळेल. तसेच संपुर्ण सुरक्षा, काळजी व निगा घेत आपल्या पर्यंत...शिरपुर फ्रेश  या नावाने उत्पादन घेवुन आलेआहेत  ज्यात सर्व प्रकारचा भाजीपाला आपल्या आवश्यकते नुसार उपलब्ध करून दिला जाईल. 

Farm To Home ही शेतकरी बांधवांची संकल्पना प्रत्यक्षात आणत आम्ही अनेक प्रकारची परीक्षणे व चाचण्या मध्ये यशस्वी झाल्यावर आपल्या सेवेसाठी हजर हाेत आहाेत. तर आपल्या पर्यंत येणाऱ्या "डिलीवरी बाॅय"साठी विशेष ड्रेस काेड, मास्क, हॅन्डग्लाेज, सॅनिटाइजर सह संपुर्ण सुरक्षित असेल. 

तसेच आपल्या समाेरच बास्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. यात कॅश आॅन डिलीव्हरी चा पर्याय उपलब्ध असुन १२० रूपये पेक्षा अधिक किंमतीचा भाजीपाला पुरवठा विनाशुल्क (अटी व शर्ती लागु) पाेहच केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध हाेणार असुन ग्राहकांची देखील साेय हाेणार आहे. 

दरम्यान किराणा व्यवसायिक सुध्दा घरपोच किराणा पुरवठा करिता माेबाईल अॅप विकसित करित अाहेत. त्याच धर्तीवर ग्राहकांची गरज लक्षात घेता आम्ही भाजीपाला अॅप विकसित केले आहे. *पण काेराेना विषाणूच्या आपत्ती मुळे व्यावसायिकांनी हा पर्याय आत्ताच स्वीकारला आहे. 

आपण देखील काळाशी सुसंगत हाेवुन आमच्या सेवेला प्रतिसाद द्यावा अशी विनंती केली आहे.

या उपक्रमाची वैशिष्ट्य-

१) Online आॅर्डर केल्यावर दुसऱ्या दिवशी  सकाळी १० पर्यंत ताजा भाजीपाला बाॅस्केट उपलब्ध करूण दिली जाईल. 

२) संपूर्ण माल हा शेतकरी बांधवांचा म्हणून गुणवत्ता व याेग्य दाम

३) नवनविन याेजना राबवुन ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध